Mediqueen Mrs Maharashtra | मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र’ : रॉयल गटातून डॉ. रेवती राणे तर क्लासिकमधून डॉ. उज्वला बर्दापूरकर विजेत्या ठरल्या

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  विविध वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी ‘मेडिक्वीन मेडिको मिसेस महाराष्ट्र’ या सौंदर्य स्पर्धेचे (Mediqueen Mrs Maharashtra) आयोजन करण्यात आले होते. सोलापूर येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. रेवती राणे (Gynecologist Dr. Revati Rane, Solapur) या रॉयल गटाच्या विजेत्या ठरल्या असून क्लासिक ग़टामधून ठाण्यातील डॉ. उज्वला बर्दापूरकर (Dr. Ujwala Bardapurkar, Gynecologist, Thane) या विजेत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातील विविध भागातून सुमारे 2०० महिला डॉक्टरांनी या Mediqueen Mrs Maharashtra स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यातून ४० स्पर्धक शेवटच्या फेरीमध्ये पोहोचले. या स्पर्धकांमधून 6 विनर घोषित करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाईन (Online) झाली असून अंतिम फेरी पुण्यातील बालेवाडी येथे झाली. यंदा स्पर्धेचे दुसरे पर्व होते. स्पर्धेच्या आयोजक डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर (Dr. Prerna Beri-Kalekar), तर समन्वयक म्हणून डॉ. प्राजक्ता शहा (Dr. Prajakta Shah) यांनी काम पाहिले. योगेश पवार यांनी कोरीओग्राफर (Choreographer Yogesh Pawar) म्हणून काम पाहिले. कशिश प्रॉडक्शन कंपनीने (Kashish Production Company) व्यवस्थापकीय काम पाहिले. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी (sameer dharmadhikari actor), डॉ. कांचन मदार (Dr. Kanchan Madar), डॉ. मीनाक्षी देसाई (Dr. Meenakshi Desai), डॉ. अश्विनी पाटील (Dr. Ashwini Patil) , पूजा वाघ (Pooja Wagh) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर (Dr. Prerna Beri-Kalekar) म्हणाल्या की, कोरोनाकाळात विशेषत: महिला डॉक्टर आपले कुटुंब सांभाळत सामाजिक भानदेखील जपत आहेत. महिला डॉक्टरांचे सामाजिक कार्य, आत्मविश्वास, तंदुरुस्ती, आरोग्याच्या जागृतीसाठी तसेच त्यांच्यातील स्व: चा शोध घेण्यासाठी या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या माध्यमातून महिला डॉक्टरांना स्वत:ला पुरेसा वेळ देता येईल, त्याचबरोबर पुन्हा नव्या जोमाने व आत्मविश्वासाने दैनंदिन कामांना सुरुवात करता येईल यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. मेडिक्वीन हि केवळ एक सौंदर्य स्पर्धा नसून यामधे सहभागी डॉक्टरांचा सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्रातील काम, कलागुण, फिटनेस, छंद, कौशल्य या आशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो. यावर्षी (Mediqueen Mrs Maharashtra) मेडिक्वीनच्यावतीने डब्लूएसडब्लू फाउंडेशनच्या (WSW Foundation) मार्फत सामाजिक कार्य म्हणून 1500 सॅनिटरी पॅड धरती फाऊंडेशनला (Dharti Foundation) दिले.

रॉयल ग्रूप (वय 23 – 47 वर्ष) मधून 3 विजेता घोषित करण्यात आले

1) विनर – डॉ. रेवती राणे – स्री रोग तज्ञ, सोलापूर (Dr. Revati Rane – Gynecologist, Solapur)

2) 1st रनर अप – डॉ. रुपाली कांबळे, दंतचिकित्सक, पुणे (Dr. Rupali Kamble, Dentist, Pune)

3) 2nd रनर अप – डॉ. निशा पानसरे, स्री रोग तज्ञ, पुणे (Dr. Nisha Pansare, Gynecologist, Pune) आणि डॉ. अर्चना पवार, दंतचिकित्सक, मुंबई (Dr. Archana Pawar, Dentist, Mumbai)

क्लासिक ग्रुप (वय 48 वर्षावरील) –

1) डॉ. उज्वला बद्रापूरकर, स्रीरोग तज्ञ, ठाणे (Dr. Ujwala Badrapurkar, Gynecologist, Thane)

2) डॉ. कोमल मेश्राम, फिजिशिअन, वर्धा (Dr. Komal Meshram, Physician, Wardha)

3) डॉ. इंद्रायणी चांदूरकर, स्रीरोग तज्ञ, मुंबई (Dr. Indrayani Chandurkar, Gynecologist, Mumbai)

सामाजिक क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल “बेस्ट सोशल वर्क” हा किताब नागपूर येथील आयुर्वेद प्राध्यापक डॉ. जया जाने यांना देण्यात आला.

Web Title : Mediqueen Mrs Maharashtra | from the Royal Group Dr. Revati Rane and from the classic Group Dr. Ujwala Bardapurkar became the winner of Medicine Mrs. Maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

India Book of Records | 5 वर्षाच्या चिमूरडीने 5 मिनिटांत म्हंटले संस्कृतचे 30 श्लोक; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली दखल

Mulethi Face Pack | सैल त्वचेत येईल घट्टपणा, केवळ एकदाच लावा मुलेठीने बनवलेला ‘हा’ फेसपॅक; जाणून घ्या

Tesla Car | भारतात टेस्ला कार लाँचिंगबाबत Elon Musk यांचे मोठे वक्तव्य, जाणून घ्या काय आहे मस्क यांचा प्लान?