Medium Spicy | मल्टीस्टारर “मीडियम स्पाइसी” मध्ये राधिका आपटेची धमाकेदार एंट्री

पोलीसनामा ऑनलाइन – Medium Spicy | अनुभवी आणि तगडी स्टारकास्ट असल्याने लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि विधि कासलीवाल निर्मित “मीडियम स्पाइसी” या चित्रपटाची सर्व थरातून मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे आणि त्यातच चित्रपटाच्या टीमने नुकतेच जाहीर केल्याप्रमाणे प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे ही गार्गी जोग नावाच्या एका विशेष भूमिकेत दिसणार आहे, त्यामुळे आता ही उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलगू, बंगाली, मल्याळम अशा विविध भाषांच्या चित्रपटांना आपल्या विविधांगी अभिनयाने आणि वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांमधून एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारी हरहुन्नरी अभिनेत्री राधिका आपटेचा अभिनय मराठी चित्रपटसृष्टीत बऱ्याच वर्षांनी “मीडियम स्पाइसी” च्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे. (Medium Spicy)
“मीडियम स्पाइसी”चे दिग्दर्शक मोहित टाकळकर व राधिका यांनी यापूर्वी मराठी प्रायोगिक नाटकांमध्ये एकत्र काम केले असल्याने लघुपट, चित्रपट, वेब सिरीज अश्या विविध माध्यमात व्यस्त असलेल्या राधिकाने या भूमिकेसाठी ताबडतोब होकार दिला. (Medium Spicy)
गार्गी जोग या छोट्या पण महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी राधिकाला भारतीय पेहरावासोबतच जपानी पेहराव सुद्धा करण्यात आला होता. जपानी पेहराव करताना राधिकाने स्वतःचा मेकअप स्वतःच करताना खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे तिचे आत्तापर्यंत न पाहिलेले हे जपानी रूप अगदी वास्तवदर्शीपणे प्रेक्षकांच्या समोर आणण्यात यश आले आहे. आता ही गार्गी जोग नक्की कोण आहे? काय करते? आणि ती भारतीय आहे की जपानी? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी प्रेक्षकांना १७ जून पासून चित्रपटगृहात जाऊन “मीडियम स्पाइसी” बघावा लागणार आहे.
मोहित टाकळकर दिग्दर्शित “मीडियम स्पाइसी” मध्ये ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता तसेच विशेष भूमिकेत स्पृहा जोशी व राधिका आपटे या तरुण कलाकारांसह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, अरुंधती नाग आणि अभिनेते रवींद्र मंकणी अशी अनुभवी आणि तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. प्रसिद्ध निर्मात्या विधि कासलीवाल यांची निर्मिती असलेल्या “मीडियम स्पाइसी” या चित्रपटाच्या माध्यमातून सुविख्यात नाटककार मोहित टाकळकर मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, इरावती कर्णिक लिखित तरुणांपासून ते जेष्ठांपर्यंत विविध वयोगटांच्या वेगवेगळ्या मनस्थितीवर आणि त्यांच्या दृष्टीकोनांवर प्रकाश टाकणारा “मीडियम स्पाइसी” येत्या १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Web Title :- Medium Spicy | Radhika Apte’s sizzling entry in multistarrer “Medium Spicy”
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Diabetes Food | मधुमेहाच्या रोग्यांसाठी काळ्या हरभर्याचे पाणी आहे वरदान, जाणून घ्या ते बनवण्याची आणि पिण्याची योग्य पद्धत
- Business Idea | अतिशय कमी गुंतवणुकीत घराच्या छतावर सुरू करा हा बिझनेस, लाखो रूपयांची होईल कमाई
- LIC Children Money Bank Plan | मुलांच्या शिक्षणाचे राहणार नाही टेन्शन ! रोज जमा करा केवळ 150 रुपये, बनवा 19 लाखाचा फंड