साऊथ ‘सुपरस्टार’ थालापति विजयवर ‘या’ अभिनेत्रीनं केला गंभीर आरोप ! म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोणत्या ना कोणत्या कारणानं सतत चर्चेत येणारी बिग बॉस तमिळची माजी स्पर्धक अभिनेत्री मीरा मिथुन पुन्हा एकदा चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. मीरानं साऊथ सुपरस्टार थालापति विजयवर निशाणा साधल्यानं ती चर्चेत आहे. मीरानं सोशल मीडियावरून विजयवर छळ केल्याचा आरोप केला आहे.

अभिनेत्री मीरा मिथुन हिनं ट्विट केलं आहे. विजयच्या फॅन क्लबचा मुख्य असलेल्या इम्मेनुएलचं नाव घेत म्हटलं आहे की, अभिनेता थालापति विजय इम्मेनुएलला सोशल मीडियावर माझा छळ करण्यासाठी पैसे देतो. पूर्ण प्लॅनिंग करत विजयकडून माझ्यावर सोशल मीडियावरून हल्ला केला जातो. इतकंच नाही तर मला आत्महत्येसाठीही प्रवृत्त केलं जातं असंही ती म्हणाली आहे. तिनं या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्मृती इराणी, थालापति यांना टॅग केलं आहे.

मीरानं एखाद्या सेलिब्रिटीवर असे काही आरोप करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिनं तृषा कृष्णन, सुपरस्टार रजनीकांत, ऐश्वर्या राजेश यांच्यासह इतर अनेक कलाकारांवर निशाणा साधला आहे.

विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो लोकेश कनंगराज डायरेक्टेड मास्टर या सिनेमात काम करताना दिसणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like