बकरी ईद 2019 : बदलत्या काळानुसार ‘हायटेक’ झाला उत्सव, बकऱ्यांची ‘ऑनलाईन’ विक्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता सण देखील हायटेक झाले आहेत. यंदा देखील बकरी ईदचा सण हायटेक झाला आहे. आता बकऱ्या ऑनलाईन विकल्या जात आहेत. ज्याप्रकारे इतर वस्तू तुम्ही ऑनलाईन बघून खरेदी करतात त्याप्रकारेच आता ईद निमित्त बकरे ऑनलाईन खरेदी करु शकतात. या होम डिलीवरी करण्यात येणाऱ्या बकऱ्यांची माहिती देखील अ‍ॅपवर देण्यात आली आहे. त्यामुळे एका क्लिकवर तुम्ही तुम्हाला आवडेल त्या प्रकारचा, वजनाचा आणि किंमतीचा बकरा खरेदी करु शकतात.

ऑनलाईन बकरे खरेदी करण्यासाठी युवा वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. बकरे विक्री करणाऱ्या व्यवसायिकांचे म्हणणे आहे की कधी असा विचार केला नव्हता की बकऱ्यांची होम डिलीवरी होईल. या व्यवसायिकांचे म्हणणे आहे की, अशी व्यवस्था बंद करण्यात आली पाहिजे कारण याचा व्यापारावर परिणाम होत आहे.

हायटेक बकरी ईद

बकरी ईद जवळ आल्याने आता बकरी विक्रीचा बाजार खुलला आहे, लोक त्यांना हवे तसे बकरे खरेदी करत आहेत. यंदा मात्र बकऱ्यांची होम डिलीवरी होत आहे. त्यामुळे आता खरेदीदार आपल्याला हवा तसा बकरा खरेदी करु शकेल. परंतू यामुळे पारंपारिक बकरे विक्रीचा व्यवसाय करणारे व्यवसायिक मात्र नाराज आहे. व्यवसायिकांचे म्हणणे आहे की सण आता हायटेक झाले आहेत, तसेच बकरी ईद देखील हायटेक झाली आहे. परंतू आता खरेदीदार मोबाइल किंवा संगणकावरुन घर बसल्या बकरे बुक करु शकू आणि काही तासात बकरे तुमच्या घरी येईल.

बकरी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोध

बकऱ्यांच्या ऑनलाईन विक्रीवर सध्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. बकरे ऑनलाईन खरेदी करता येतील म्हणून काही जण खूश आहेत तर काहींना हे मान्य नाही. बकरे विक्री करणारे व्यापारी याला विरोध करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की बकरे ऑनलाईन विक्री केले जात असतील तर त्याचा परिणाम व्यापारावर होईल आणि असे असेल तर मग व्यापारात तोटा होईल.

आरोग्यविषयक वृत्त