नंबर प्लेटवर लिहीलं होतं ‘राम’, वाहतूक पोलिसांनी पकडलं अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रविवारी सायंकाळी वाहतूक निरीक्षक डीडी दीक्षित गढ रोडवर वाहनांची तपासणी करत होते. तेव्हा त्यांना एक कार दिसली ज्यावर नंबर चुकीचा लिहिला गेला होता. वाहतूक पोलिसांनी नंबर प्लेटमधील सुधारणांविषयी सांगितले असता आरोपींनी सांगितले की, कारचे चलन केले तरी नंबर प्लेट तशीच राहील. त्यानंतर नंबर प्लेट स्पष्ट नसल्यामुळे पोलिसांनी ई-चलन जारी केले.

कार चालक म्हणाला की, ‘हा नंबर मिळविण्यासाठी मला 31 हजार रुपये खर्च करावे लागले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी चलन फाडले किंवा गाडी जप्त केली तरी नंबर प्लेट अशीच राहील.’

तो कार चालकास पुढे म्हणाला की, ‘तो श्री रामभक्त आहे.’ अशाप्रकारे नंबर प्लेटवर लिहिणे हे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन असून त्यामुळे त्याच्यावर 300 रुपये दंड ठोठावण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाहतूक पोलिस म्हणाले की, मोटार वाहन कायद्यांतर्गत नंबर प्लेटवर नंबर स्पष्ट न केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. त्या कार चालकावर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. नंबर प्लेट दुरुस्त न केल्यास त्याच्यावर नियमांनुसार दुप्पट चलन आकारले जाईल.