‘निर्भया गँगरेप’ प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची तयारी सुरू, ‘या’ दिवशी लटकवणार फासावर ?
मेरठ : वृत्तसंस्था – निर्भया गँगरेपमधील दोषींना फाशी देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर रोजी सर्वांना फाशी दिली जाऊ शकते. जिथे फाशी दिली जाणार आहे त्या ठिकाणच्या साफ-सफाईला सुरुवात झाली आहे. यापैकी एक आरोपी विनय शर्माकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका गृहमंत्रालयानं नामंजूर करण्याची शिफारस केली आहे. अशीही बातमी समोर आली आहे की, आरोपी पवनला मंडोली जेलमधून तिहाड जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.
एका आरोपीचा मृत्यू
निर्भया गँगरेपमधील प्रकरणातील 6 आरोपींपैकी एका आरोपीचा जेलमध्येच मृत्यू झाला आहे. एक अल्पवीयन आपली शिक्षा पूर्ण करून जेलमधून बाहेर आला आहे. बाकी चार आरोपींची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्यामुळे अद्याप त्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकत नाही. गृहमंत्रायलयानं ही याचिका नामंजूर करण्यासाठी शिफारस केल्यानंतर आता लवकरच यावर राष्ट्रपतींकडून निर्णय घेतला जाईल. जर या प्रकरणातील आरोपींना फाशी झाली तर याची जबाबदारील मेरठमधील पवन जल्लादला दिला जाईल. अद्याप अधिकृतपणे यासाठी पवनशी संपर्क झालेला नाही.
पवन जल्लादनंही केली फाशी देण्याची मागणी
एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवन जल्लदनंही निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. पवन जल्लाद म्हणाला, “असं भयानक कृत्य करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे, जेणेकरून दुसरे गुन्हेगारदेखील हे पाहून घाबरतील. त्यांच्याही मनात असा गुन्हा करण्याआधी फाशीचा विचार यायला हवा.
Visit : Policenama.com
- ‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या
- ‘थंड दूध’ पिण्याने वाढते सौंदर्य ! ‘हे’ ५ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
- प्रोटीन्सचा खजिना आहे ‘डाळ-भात’ ! रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ ५ फायदे
- तु ‘चीज’ बडी है मस्त-मस्त ! हाडे होतील मजबूत, हे आहेत ५ आरोग्यदायी फायदे
- उसाचा रस पिताना घ्या काळजी, ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा