‘PAK मध्ये जा’च्या विधानावर ओवैसी भडकले, म्हणाले – ‘गोळया संपतील पण आम्ही संपणार नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM ) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मेरठचे एसपी अखिलेश नारायण सिंह यांच्या ‘पाकिस्तानला जाण्याच्या’ विधानावर टीका केली. ओवेसी म्हणाले, ‘लोकांनी तुमची वर्दी पाहून आदर देत सोडून दिले. १८५७ मध्ये हिंदू आणि मुस्लिमांनी मिळून मेरठमधून इंग्रजांवर गोळ्या झाडल्या. एसपी, तुमच्या बुलेट संपतील, पण आम्ही संपणार नाही. आता यापुढे अन्य कोणत्याही प्रकारचा संकोच होणार नाही. आम्ही कुठेही जाणार नाही.

विशेष म्हणजे मेरठमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निषेधकर्त्यांना पाकिस्तानमध्ये जाण्यास सांगितल्याच्या विधानावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये मतभेद दिसून आले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मेरठच्या पोलिस अधीक्षक (एसपी) चा बचाव केला असताना केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. शनिवारी उत्तर प्रदेशातील भाजप नेत्यांनी मेरठचे एसपी अखिलेश नारायण सिंह यांचा बचाव केल्यानंतर नकवी यांनी मुंबईत सांगितले की, “जर हे सत्य असेल तर ते निंदनीय आहे. संबंधित अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई केली जावी.” उमा भारती यांनीही सिंगचा बचाव केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणाले, मी मेरठ शहराच्या एसपीबरोबर उभा आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (सीएए) विरोध करणाऱ्या निदर्शकांना मेरठच्या एसपीने पाकिस्तानात जाण्यास सांगितले. जे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे. नंतर शनिवारी सिंह म्हणाले की, त्यांना सक्तीने हे सांगावे लागले कारण आंदोलक ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे घोषणा देत होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/