आयुष्य ‘तमाशा’ बनलंय, मृत्यूला बनवू नका, सुसाइड नोटच्या शेवटी शिक्षिकेनं लिहीला ATM चा PIN आणि घेतली फाशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माझे आयुष्य एकदम तमाशा झाले आहे, परंतु माझ्या मृत्यूचा तमाशा करू नका असे आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून एका शिक्षिकेने आपले जीवन संपवले. भावनपुर येथे कोरल स्प्रिंग कॉलोनी मध्ये ही शिक्षिका राहत होती. एका वर्षांपासून ही महिला आपल्या पतीला सोडून राहत होती आणि न्यायालयात घटस्फोटासाठी प्रयत्न करत होती.

मिळालेल्या माहितीनुसार प्रीती बाला भाड्याच्या घरामध्ये राहत होती. दोन दिवसांपासून त्या शाळेत गेल्या नव्हत्या त्यामुळे अशोक नावाचे दुसरे शिक्षक प्रीती यांच्या घरी पोहचले. बराच वेळ कोणीही दरवाजा न उघडल्याने त्यांना संशय आला तेव्हा त्यांनी जाळी तोडून दरवाजा उघडला तर आतमध्ये प्रीतीचा मृतदेह लटकलेला त्यांना दिसला. त्यांनी लगेच याबाबतची माहिती पोलिसाना दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत सुसाईड नोट ताब्यात घेतली आणि प्रीतीच्या नातेवाईकांना याबाबत खबर दिली.

घटस्फोटाची सुरु होती केस
2006 मध्ये प्रीतीचे लग्न झाले होते. तिला आठ वर्षांची एक मुलगी देखील आहे जी डेहराडून येथे तिच्या आजीकडे राहते. 2018 ला पतीसोबत वाद झाल्याने प्रितीने घर सोडले होते. दोघांच्या घटस्फोटाची केस देखील सुरु आहे. गेल्या 11 डिसेंबर रोजी कोर्टात याची पहिली तारिक होती.

सुसाईड नोटमध्ये लिहिला डेबिट कार्डचा पिन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीतीच्या पर्समधून जी सुसाईड नोट मिळाली त्यामध्ये तिने आत्महत्येला स्वतः ला जबाबदार धरले आहे. आपल्या अंतिम संस्कारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी तिने आपल्या डेबिट कार्डचा पिन देखील लिहिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/