क्वारंटाईन सेंटरमधून गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी काढला पळ ! मात्र, आता खावी लागतेय तुरुंगाची हवा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. यामुळे जगभरात जनजीवन विस्कळीत झालं आहे. महामारीचा फटका जगाती बलाढ्या देशांसह इतरही देशांना सहन करावा लागत आहे. सुमारे 5 महिन्यानंतर देशातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. लोकांना एममेकांपासून बाजूला करण्याचं काम या कोरोनाने केलं आहे. अगदी जवळच्या नातेवाईकांपासूनही सुरक्षित अंतर ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र, एका प्रेमी युगलाने कोरोना विषाणूचे बंधन तोडून प्रेमासाठी काही करून दाखवलं. ऑस्ट्रेलिया देशात एका बॉयफ्रेंडने क्वारंटाईन सेंटरमधून पळ काढून गर्लफ्रेंडची भेट घेतली. मात्र, त्याला यामुळे तरुंगाची हवा खावी लागली आहे.

ऑस्ट्रेलिया देशातील पर्थ येथील ही घटना आहे. युसूफ काराकया नावाच्या युवकाने हे धाडस दाखवले आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथून 30 जुलै रोजी युसूफ पर्थ येथे गेला. त्यामुळे युसूफला क्वारंटाईन केले होते. मात्र, आपल्या गर्लफ्रेंडचा विरह त्याला सहन नाही झाला. त्यामुळे तिला भेटण्यासाठी तो तिच्याकडे पोहोचला.

याबाबत ‘डेली मेल’ने वृत्त दिले आहे, त्यानुसार, युसूफला पर्थ इथल्या एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले होते. या हॉटेलमधील तिसर्‍या मजल्यावरील खिडकीतून तो बाहेर पडायचा आणि त्याच्या प्रेयसीला भेटायला जात होता. त्यानंतर रात्रीच्या अंधारामध्ये तो चोरपावलांनी खिडकीतून हॉटेलमध्ये येत होता.

क्वारंटाईनमध्ये असताना अनेकदा युसूफने असे केले.मात्र, एकदिवशी तेथील स्टाफने खिडकीच्या खाली लावलेली शिडी काढल्यानंतर युसूफच्या प्रेयसी भेटीचा भांडाफोड झालाय. याप्रकरणी माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी त्यास अटक केलीय. कोरोना विषाणूचे नियम तोडून कायद्याचा भंग केला आहे, याप्रकरणी तेथील न्यायालयाने युसूफला 6 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावलीय. गर्लफ्रेंडचा बर्थ डे असल्याने तिला भेटण्यासाठी गेलो होतो, असे युसूफने न्यायालयात सांगितले. मात्र, न्यायालयाने त्यास 6 महिन्यांची शिक्षा सुनावलीय. पण, त्यास केवळ 1 महिनाच तुरुंगात रहावे लागणार आहे. कारण, बाकीची शिक्षा एक वर्षासाठी स्थगित केलीय.