स्पायडर वूमनची कमाल ! 15 मीटरची भिंत 6.995 सेकंदात चढत केले सर्व ‘रेकॉर्ड’ब्रेक (व्हिडिओ)

बीजिंग : वृत्तसंस्था – एका महिला क्लायंबरने 15 मीटरची भिंत 6.995 सेकंदात चढत नवीन रेकॉर्ड बनवत IFSC Climbing World Cup मध्ये विजय मिळवला आहे. Aries Susanti Rahayu असे या महिलेचे नाव असून इंडोनेशियाची आहे.

IFSC Climbing World Cup साठी चीनमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही स्पर्धा पुरूष विरूद्ध महिला अशी होती. या महिला क्लायंबरने पुरुष प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवत 15 मीटरची भिंत केवळ 6.995 सेकंदात पार केली. या स्पर्धेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक तीच कौतुक करत आहेत. स्पायडर मॅनला विसरा … ही आहे नवीन महिला स्पायडर मॅन अशा शब्दांत युजर्सनी तिचे कौतुक केले आहे.

 

Visit : Policenama.com