अखेर वेळ मिळाला…..

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

आळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची मंगळवारी, भरदुपारी, रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली. या गंभीर प्रकारला तीन दिवस झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांना कांबळे यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यास वेळ मिळाली. मंगळवारी कांबळे यांच्या नातेवाईकांची भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ,पालकमंत्री गिरीश बापट, आमदार सुरेश गोरे यांनी घरी जाऊन भेट घेतली. यावेळी नातेवाईकांनी ‘मास्टर माईंड’ अजूनही मोकाट असून त्याला अटक करण्याची मागणी केली.

यावेळी दानवे,बापट यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गावडे यांना बोलावून सदर तपासाची माहिती घेतली तसेच गुन्ह्याचा तपास तातडीने करण्याचे,आळंदी परिसरात पोलीसगस्त वाढविण्याचे आदेश दिले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

[amazon_link asins=’B0794719T8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f8e01623-7b9c-11e8-8a75-d1d77d3ee2e1′]

नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या निधनानंतर कांबळे यांचे कुटूंब उघड्यावर आले असून शासना मार्फत आर्थिक मदत करावी,घरातील एका सदस्याला नोकरी द्यावी,अल्पवयीन असले तरी गुन्हेगारांना अभय देऊ नये,आम्हा गरिबांना न्याय द्यावा अशा मागण्या केल्या. मात्र भाजपच्या नगरसेवकाची हत्या होऊनही तीन दिवसानंतर पक्षाचे नेते मंडळी सांत्वनासाठी आल्याची चर्चा होती.