‘रॉकेट वुमन’ आणि ‘डेटा क्वीन’ यांची ‘चांद्रयान २’ मध्ये महत्वपूर्ण भूमिका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्रप्रदेशमधील श्रीहरीकोटा येथे असलल्या सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर येथून उद्या पहाटे (१५ जुलैला) २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान २ मिशन लाँच होणार आहे. भारतासाठी हे महत्वपूर्ण मिशन मानले जात आहे. इस्रोच्या या महत्वपूर्ण मिशनमध्ये दोन महिलांच्या भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहेत. मुथैया वनिता (प्रोजेक्ट डायरेक्टर) आणि रितु कारिधाल (मिशन डायरेक्टर) या दोन महिला या मिशनमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. इस्रोच्या इतिहासात अशी घटना पाहिल्यान्दाच होताना दिसून येत आहे.

या दोन्ही महिला वैज्ञानिकांचे कौतुक करताना इस्रोचे अध्यक्ष के सिवन म्हणाले की, चांद्रयान २ मिशनच्या टीममध्ये ३०% महिला आहेत. भारताच्या या दुसऱ्या महत्वपूर्ण चांद्रयान मिशनचे नेतृत्व महिलांनी केले आहे. या दोन्ही महिला २० वर्षांपासून इस्रोमध्ये काम करत आल्या आहेत.

‘बेस्ट साइंटिस्ट’ मुथैया वनिता आहेत डेटा क्वीन

चांद्रयान २ मिशनच्या प्रोजेक्ट डायरेक्टर वनिता यांना २००६ मध्ये सर्वश्रेष्ठ महिला वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. इस्रोच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करत आहे. या आधी वनिता यांनी कार्टोसेट-1, ओशियनसेट-2 आणि मेघ ट्रॉपिक्स उपग्रहांसंबंधी डेटा सिस्टीममध्ये सहनिर्देशक म्हणून काम केले आहे. वनिताला डेटा क्वीन म्हणून ओळखले जाते. डेटा हॅन्डल करण्यामध्ये वनिता तरबेज आहे. चांद्रयान मिशन १ चे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. एम अन्नादुरई यांनी वनिताला चांद्रयान मिशन २ ची प्रोजेक्ट डायरेक्टर होण्यासाठी प्रेरित केले.

मंगळ मिशनपासून ते चांद्रयान मिशनपर्यंत रितू आहे ‘रॉकेट वुमन’

चांद्रयान २ मिशनची डायरेक्टर रितूने २०१३ मध्ये भारताच्या महत्वकांशी मंगळयान मिशनमध्ये वैज्ञानिक म्हणून काम केले आहे. हे मिशन खूप यशस्वी झाले होते. या मिशनमध्ये रितुने मिशनमध्ये ऑपरेशनमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. रितूच्या कौशल्याला ओळखून यावेळेस तिला महत्वपूर्ण भूमिका देण्यात आली.

अंतराळ विज्ञानातील रितूचे कौशल्य पाहून तिला रॉकेट वुमेन म्हंटले जाते. १९९७ पासून रितू इस्त्रोसोबत काम करत आहे. रितूला माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मानित देखील करण्यात आले आहे.

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात