‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस ठाण्यात लॉन्स व मंगल कार्यालय मालक यांच्यात बैठक

लासलगाव : ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी नाशिक यांनी मार्गदर्शक सूचना जारी केलेले असून त्या अनुषंगाने लग्न समारंभासाठी १०० लोकांची उपस्थिती व अंत्यविधीसाठी २० लोकांची उपस्थितीचे बंधन ठेवण्यात आलेली आहे तसेच सर्व सार्वजनिक राजकीय धार्मिक कार्यक्रमावर बंदी लादण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना सर्वांनी मास्क सॅनिटायझर व दोन व्यक्ती मधील सामाजिक अंतराचे पालन करणे कायद्याने बंधनकारक आहे.याबाबत आज लॉन्स, हॉल व मंगल कार्यालय मालक यांची बैठक लासलगाव पोलीस ठाण्यात संपन्न झाल्याची माहिती सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करतील अशा नागरिकांवर विशेष पथकाचे मार्फत दंडात्मक व प्रचलित कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.याबाबत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व लॉन्स, हॉल व मंगल कार्यालय मालक यांची पोलीस स्टेशन येथे मीटिंग घेण्यात येऊन सदर मालकांना जिल्हाधिकारी नाशिक यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना समजून सांगून तसेच सर्व संबंधितांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्याची तजवीज ठेवली आहेत.

आतापावेतो दोन दिवसांमध्ये १७ नागरिकांवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केले म्हणून लासलगाव पोलीस स्टेशन कडून कारवाई करण्यात आली असून यापुढे विनामास्क व सामाजिक अंतराचे पालन न करणारे नागरिकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ कोठाळे व तीन अंमलदार यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे