SCO शिखर संमलेन २०१९ ; PM मोदींनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना सांगितले, तरच होणार पाकशी ‘चर्चा’

बिश्केक : वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये पाकिस्तानविषयी देखील चर्चा झाली. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना स्पष्टपणे सांगितले की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करत नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबत चर्चा केली जाणार नाही.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना सांगितले की दोन्ही देशातील संबंध सुधारणे गरजेचे आहे. याचबरोबर मोदींनी अनौपचारिकरित्या शिखर संमेलनात स्वागत केले. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी या वर्षी भारतात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या १९ व्या शिखर संमलेनात सहभागी होण्यासाठी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे पोहचले. शिखर संमलेनात मोदींनी स्वतंत्रपणे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांनी या संमेलनात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची देखील भेट घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील या संमेलनात सहभागी झाले आहेत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी इम्रान खान यांची भेट घेण्याची कोणतीही शक्यता नाही.

मोदींनी टाळले पाकिस्तानचे हवाई क्षेत्र

या संमेलनाला जात असताना नरेंद्र मोदी यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर केलेला नाही. त्यांचे विमान ओमान, इराण मध्य आशिया या मार्गावरून गेले. नरेंद्र मोदींचे विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावरून जाण्यासाठी पाकिस्तानकडे भारताने परवानगी मागितली होती आणि पाकिस्तानाने देखील परवानगी दिली होती. परंतु पंतप्रधानांचे विमान ओमान, इराण, मध्य आशिया या मार्गाने गेले.

सिने जगत – 

#Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीला टायगर श्रॉफने दिलं ‘हे’ बर्थडे ‘गिफ्ट’

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !