स्थायी समितीची बैठक सलग दुसऱ्यांदा तहकूब

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची बैठक सलग दुसऱ्या आठवड्यात तहकूब झाली आहे. आजच्या बैठकीस आयुक्त नसल्याचे सांगितले जात असले तरी कारण मात्र नक्कीच वेगळे असल्याची कुजबुज पालिका वर्तुळात सुरू आहे.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’50cb47b2-84fa-11e8-8bea-9bf9df88c23b’]

गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभा तहकूबीचे सत्र सुरू होते. सव्वा वर्षात तब्बल २१ सभा तहकूब करण्याचा विक्रम सत्ताधाऱ्यांनी केलायं. त्यापाठोपाठ आता स्थायी समितीच्या तहकूबीचा ‘सिलसिला’ सुरू झालयं. गेल्या आठवड्यात देखील स्थायीची बैठक तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर आता आयुक्त श्रावण हर्डीकर नसल्यामुळे आजची सभा तहकूब केल्याचे सदस्यांकडून सांगण्यात आले. मात्र शहरात होणाऱ्या पंतप्रधान आवासयोजनेबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये दुसऱ्या आठवड्यातही एकमत न झाल्याने आजची सभा तहकूब करण्यात आल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे.

केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बोऱ्हाडेवाडी येथे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. तो विषय आज स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु, या विषयावर भाजपामधील दोन गटांमध्ये एकमत न झाल्यामुळे सलग दुसऱ्या आठवड्यातही सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवली आहे.
[amazon_link asins=’B07DX1K7CT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bd0c720f-84fa-11e8-b077-f7588f0ee9a2′]