महाआघाडी सरकारला कोंडीत पकण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबाबतचा दिलेला निर्णय व मराठा आरक्षणाची बाजु मांडण्यात अपयशी ठरलेले राज्यातील तीन पक्षाचे महा आघाडी सरकारला मराठा आरक्षण मुद्यावरून कोंडीत पकडण्यासाठी नवी मुंबई येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाच्या पदाधीकार्‍यांची महत्वाची बैठक बोलविण्यात आली होती.सदर बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सरकारला धारेवर धरण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यात आल्याची माहीती माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री मंत्री तथा भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना दीली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी कायदेतज्ज्ञाची समिती स्थापन करण्यावर या बैठकीत चर्चा झाली असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पाटील, गिरीश महाजन, श्रीकांत भारतीय, राणा जगजीतसिंह पाटील, प्रसाद लाड यांचेसह आनेक नेते उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजातील युवकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यामध्ये अपयशी ठरले आहे. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभ्यासपूर्ण आपली मते व्यक्त केली.