विखे यांच्या भाजप प्रवेशास विरोध ; पालकमंत्र्यांच्या कार्यालयातच कार्यकर्त्यांची बैठक

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. आज जामखेड येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन विखे यांच्या उमेदवारीस जोरदार विरोध केला आहे. शिंदे यांच्या मतदारसंघातील पक्षाचे कार्यकर्ते विख यांच्या विरोधात उतरलेल्यामुळे आता पालकमंत्री नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर जामखेड तालुक्यातील कार्यकर्ते आज पालकमंत्री शिंदे यांच्या कार्यालयात त्यांच्या भेटीसाठी आले होते. जामखेड हा शिंदे यांचा मतदारसंघातील तालुका आहे. येथील कार्यकर्त्यांनी विखे यांच्या भाजप प्रवेशाचा कडाडून विरोध केल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. मात्र विखे यांच्या पक्षप्रवेशाबाबत भाष्य करणे टाळले आहे.

दरम्यान शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे आमदार मोनिका राजळे यांनीही विखे यांना विरोध असल्याचे बोलले जात आहे. त्यांना पक्ष संघटनेतून विरोध होऊ लागल्याने वरिष्ठ पातळीवरील नेते नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार दिलीप गांधी ही अस्वस्थ झाले असून त्यांनी तातडीने दिल्ली गाठली आहे. पक्षाच्या हायकमांडच्या भेटीसाठी ते दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ह्याहि बातम्या वाचा

नैरोबीत विमान दुर्घटनेत १५७ लोक दगावल्याची भिती

रामदास आठवलेंच्या अडचणीत वाढ ; दक्षिण-मध्य मुंबईतून शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा

मुख्यमंत्री फडणवीस यांचा घणाघात ; राज ठाकरे सुपारी घेऊन भाषणे करतात आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री हे वाचा सविस्तर

चक्क पोलीस ठाण्यातच रंगला पत्त्याचा खेळ पहा व्हायरल झालेला व्हिडीओ आणि वाचा सविस्तर