चावरा हायस्कुल मध्ये मुख्याध्यापकांची सहविचार सभा संपन्न

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – देवपुर येथील वलवाडी परिसरातील चावरा हायस्कुलमध्ये 2019-20 शैक्षणिक नियोजन बाबत सहविचार सभा घेण्यात आली. जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापकांची सहविचार सभा 2019-20 शैक्षणिक नियोजन बाबत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. न्या.जे.ए.शेख यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे गुलाब पुष्प, श्रीफळ, शाल देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा आणि विविध शाळेतील सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार न्या.शेख यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मुख्याध्यापक मार्गदर्शिका 2019-20 पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात बोलताना न्या.जे ए शेख यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना सांगितले की, चालु सत्रात विद्यार्थांना शिष्यवृत्ती वाटप अर्ज ऑनलाईन पध्दतीने निट भरुन घ्या, काही अडचण आल्यास माझेशी संपर्क साधा. बौध्द, ख्रिचन, मुस्लिम, जैन अल्पसंख्यांक विद्यार्थांना शिष्यवृत्ती शासन नियमानुसार वाटप करण्यात येणार आहे.शालेय विद्यार्थी लैगिंग शोषण बाबत सर्तक रहावे. पोस्को कायदा विषयक माहिती पुढील काही दिवसात वेळ सत्र आयोजन करुन कायदे विषयक माहिती आपणास देईन अन्य शालेय अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले. तसेच मतदान जनजागृती बाबत सामुहिक शपथ घेण्यात आली.

यावेळी व्यासपिठावर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुभाष बोरसे, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी रंजीता ढिवरे, भावना पाटील, वासंती पवार, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय बोरसे, एस. बी. सुर्यवंशी, डि. के. पवार, पी. व्ही. पाटील, जे. एच. सांळुखे, सतिष देवरे, जवाहर पवार, के. जे. पाटील, उदय तोरवणे, बी. एम. अहिरे, संजिव पाटील, सुनिल पाटील, आर. डि. शिसोदे, आर. एन. भदाणे, एस. एम. भंडारी आदी. सह मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका मोठ्या संख्येने सहविचार सभेत उपस्थित होते.

सुत्रसंचालन जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष, प्राचार्य आर. व्ही. पाटील यांनी केले.

आरोग्यविषयक वृत्त –