पाथरी येथे नवरात्रोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त बैठक

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन –   ईद-ए-मिलाद व नवरात्रोत्सव निमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार रोजी पाथरी पोलीस ठाण्यात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महसूल व पोलिस प्रशासन अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ( 15 ) ऑक्टोंबर रोजी महसूल व पोलिस प्रशासनाच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला गाव पोलीस पाटलांची उपस्थिती होती.

वरिष्ठ अधिका् यांनी केलेल्या सूचनांबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. कोरोना संकट काळात नवरात्रोत्सव आणि ईद-ए-मिलाद जवळ येत असल्याने सर्वांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पाथरी येथे नव्याने दाखल झालेले तहसीलदार श्रीकांत निळे यांचा सत्कार करण्यात आला. पाथरी पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक बालाजी तीप्पलवाड व उपस्थित पोलिस पाटील यांनी तहसीलदार श्रीकांत निळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तहसीलदार श्रीकांत निळे हे नुकतेच बीड जिल्ह्यातून पाथरी येथे दाखल झाले आहेत. त्यांनी नुकताच पाथरी तहसील कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळण्यासाठी उपस्थितांना आवाहन करण्यात आले. पाथरीचे तहसीलदार श्रीकांत निळे पोलीस निरीक्षक तिप्पलवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.