बलात्कार प्रकरण : तब्बल २० वर्षानंतर होणार ‘त्यांची’ मेडिकल टेस्ट

मुंबई : वृत्तसंस्था  – #MeToo  मोहिमेअंतर्गत बलात्काराचा आरोप असलेले अभिनेते आलोकनाथ यांच्याविरोधात अलीकडेच गुन्हा दाखल करण्यात आला होता. आलोकनाथ यांच्यावर लेखिका- निर्माता विनता नंदा यांच्यांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबूजी ‘ म्हणून ओळखले जाणारे आलोकनाथ यांच्या विरोधात विनता नंदा यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता या घटनेच्या २० वर्षांनंतर पोलिसांनी विनता यांना मेडिकल टेस्टसाठी बोलवले आहे.
विनता नंदा यांनी केली नाराजी व्यक्त 
माध्यमांशी बोलताना विनता नंदा यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आलोकनाथचे खरे रुप समोर आणण्यासाठी मी माझी शारीरिक चाचणी करेल, असे विनता नंदा यांनी म्हटले आहे. आलोकनाथ यांच्याविरोधातील तक्रार दाखल करूनही या प्रकरणात फारसे काही घडले नाही. तक्रार दाखल केल्यानंतर ३ आठवड्यानंतर पोलिसांनी मला बोलवले आणि आता आम्ही एफआयआर दाखल करणार. एफआयआर दाखल केल्यानंतर आलोकनाथ यांना अटक कराययला किंवा त्यांची चौकशी व्हायला हवी होती. पण आता माझीच चौकशी होत आहे. मीच माझे आरोप सिद्ध करावे, याची जबाबदारी माझ्यावरचं येऊन पडलीय. आता मला वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे. तेही २० वर्षांनंतर. मला ही चाचणी करावीच लागेल. तेव्हाच केस पुढे जाईल, असे पोलिस म्हणत आहेत, असे विनता नंदा यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले आहे.
विनता नंदा यांनी मीटू मोहिमेअंतर्गत आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी पोस्ट लिहिली होती. एका पार्टीनंतर मी एकटी घरी जात होते. त्यांनी मला लिफ्ट देण्याची आॅफर दिली. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मी कारमध्ये बसले. त्यानंतरचे मला अंधूक आठवते. मला जेव्हा जाग आली तेव्हा मला वेदना होत होत्या. मी बेडवरुन उठू शकले नाही. याबद्दल मी माझ्या मित्रांना सांगितले, परंतु सर्वांनी या घटनेला कायमचे विसरुन जाण्याचा सल्ला दिला, असे विनता नंदा यांनी म्हटले होते. विनता नंदा यांच्याशिवाय अभिनेत्री संध्या मृदृल हिनेही आलोकनाथ वर गैरवर्तनाचा आरोप केला होता.
#MeTo  मोहिमेअंतर्गत आज पर्यंत अनेक दिग्गज कलाकार आणि निर्माता, दिग्दर्शक यांच्यावर आरोप झाले आहेत.

…म्हणून होमोसेक्शुअल करतात आत्महत्या