मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर १५ दिवसांसाठी ‘मेगा ब्लाॅक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १६ एप्रिल २०१९ ते ५ मे २०१९ या कालावधीत शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून अमृतांजन ब्रिज येथे किमी नं. ४५/७१० ते ४५/९००, आडोशी येथे कि. मी. ४०/७८० ते ४०/९९५ , खंडाळा येथे किमी ४६/९३५ ते ४७/९१० आणि भातन बोगदा येथे ४६/९३५ ते ४७/९१० येथे दोन्ही बाजूस दरड कोसळणाऱ्या प्रवण क्षेत्रांमध्ये स्केलिंगचे काम किमी १५. २४१ ते कि. मी. ते ७०. ०७९ वर महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ, पुणे यांच्यातर्फे करण्यात येत आहे. पुणे विभागात २ ठिकाणी ब्लॉक असणार आहे अशी माहिती पुणे महामार्गचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली आहे.

सदर ढिले झालेले दगड काढतेवेळी प्रवाशांच्या सुरक्षिततेकरता व कामकाज सुरळीत पार पाडण्याकरिता नमूद ठिकाणी सकाळी १० ते ०४:१५ या कालावधीत दिवसातून ०६ वेळा प्रत्येकी १५ मिनिटांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. त्याची माहिती खालील प्रमाणे –

१) ब्लॉक ०१ – १०. ०० ते १०. १५
२) ब्लॉक ०२ – ११. ०० ते ११. १५
३) ब्लॉक ०३ – १२. ०० ते १२. १५
४) ब्लॉक ०४ – ०२. ०० ते ०२. १५
५) ब्लॉक ०५ – ०३. ०० ते ०३. १५
६) ब्लॉक ०६ – ०४. ०० ते ०४. १५