खुशखबर ! एसटी महामंडळाने काढली एवढ्या हजार पदांची भरती

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक आणि चालक पदाच्या ८०२२ पदांची भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीचे वैशिष्ठ म्हणजे १ वर्षाचा वाहन चालकाचा परवाना असलेल्या महिला हि या भरतीत चालक पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीतून निवडलेल्या महिलानांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत राज्यात सध्या ८ हजार २२ इतक्या चालक आणि वाहक पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. यापैकी दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांमध्ये ४ हजार ४१६ तर इतर जिल्ह्यांमध्ये ३ हजार ६०६ इतकी पदे भरली जाणार आहेत. दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीस १५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर या पूर्वीच्या नियोजनानुसार अर्ज करण्याची मुदत आज दि. ८ फेब्रुवारी रोजी संपुष्ठात येणार होती. इतर जिल्ह्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या पदांसाठी २४ फेब्रुवारी रोजी संबंधीत जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परिक्षाघेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

अनुभवाच्या अटीत दिली सरकराने शिथिलता
या पूर्वी वाहक पदासाठी पुरुष उमेदवाराला तीन वर्ष वाहन चालवल्याचा परवाना असणे आवश्यक होते आता मात्र फक्त एक वर्षांचा अवजड वाहन चालवण्याचा अनुभव असणाऱ्या चालकाला एस टी मध्ये चालक पदासाठी अर्ज करता येऊ शकणार आहे.

चालक आणि वाहक पदाच्या भरतीत भाग घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांनीं महराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती मिळवावी असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us