खुशखबर ! वीजकंपन्यांमध्ये होणार मेगा भरती, ४५ दिवसांची ‘डेडलाईन’ : ऊर्जामंत्र्यांचे आदेश

मुंबई : वृत्तसंस्था – राज्यात सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी आता मेगा भरती करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यानुसार वीज कंपन्यांमध्ये सुमारे ४६ हजारहून अधिक पदांची भरती होणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यासंदर्भात आदेश काढला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी ४५ दिवसांची ‘डेडलाईन’ ठेवण्यात आली आहे.

वर्ग १ ते ४ या प्रवर्गासाठी ही भरती होणार आहे. येत्या आठवडाभरात तब्बल ४६ हजारांहून अधिक पदांच्या या मेगाभरतीला प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांच्या कालावधीत राज्यातील औद्योगिकीकरणाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कारखानदारी वाढत असल्याने विजेच्या मागणीतही वाढ होत आहे. त्याशिवाय नागरीकीकरणात वाढ होत असल्याने विजेच्या मागणीतही वाढ होत आहे.

त्यामुळे महावितरणसह अन्य वीजकंपन्यांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील ताण वाढत चालला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा देताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे वास्तव असतानाच महावितरणसह महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांमधील तब्बल ३५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे या ग्राहकांना सेवा देताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मर्यादा येत असल्याने कामगार संघटनांनी केलेल्या मागणीनुसार ही मेगाभरती होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पपईच्या रस प्यायल्याने होतात ‘हे’ ७ फायदे

शुक्राणू वाढविण्यासाठी ‘ही’ आसने आहेत लाभदायक

दीर्घकाळ तारुण्य टिकवा, दिवसभरातील ‘या’ चुका टाळा

पौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण आयुर्वेदीक उपाय

You might also like