home page top 1

खुशखबर ! राज्य सरकारकडून २० हजार पदांसाठी भरती, जाणून घ्या ‘विभाग’वार आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक दिवसांपासून रखडलेल्या मेगाभरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मराठा आरक्षण सुधारणा विधेयकावर काल राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर आता  शासनाच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर भरतीला लवकरच सुरुवात होणार आहे. मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आणि नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय १ जुलैपासून अंमलात आणण्यात आला आहे. यामुळे आता सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाच्या तरुणांना १३ टक्के आरक्षण मिळणार आहे.

आतापर्यंत साधारण २० हजार जागांसाठी जाहिराती निघाल्या आहेत. तर उर्वरित विभागांमधील रिक्त पदांसाठी लवकरच जाहिराती निघणार आहेत. विविध विभागांमध्ये तब्बल ७२ हजार पदांसाठी ही भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१८ मध्ये केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे या भरतीला  स्थगिती देण्यात आली होती.

 

कोणत्या विभागात किती पदांसाठी होणार भरती ?

ग्रामविकास विभाग – १३,००० पदं

कृषी विभाग – १५८५ पदं

वन संरक्षक विभाग – १५०० पदं

सार्वजनिक बांधकाम विभाग – ४३५ पदं

जलसंधारण विभाग – २५० पदं

आरोग्य विभाग – ८०० पदं

वित्त (ऑडिट) विभाग – ९५९ पदं
पावसाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पुण्यातील रुग्णालये आणि कॉलेजमध्ये बेकायदा पार्किंग बंद करा – रिपाइं

मुख्यमंत्र्यांची आमदारकी धोक्यात ? २३ जुलै ला फैसला !

Loading...
You might also like