‘मेगाभरती’ने पक्षाची संस्कृती ‘बिघडली’, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची ‘कबुली’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर इतर पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजपकडून मेगाभरती राबवण्यात आली. यावेळी अनेक नेते भाजपमध्ये आयात केले गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे गड कोसळताय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

विधानसभा प्रचारावेळी 200 के पार चा नारा देणाऱ्या भाजपला निकालाअंती 105 जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे अनेक आयात झालेल्या नेत्यांना तिकिट देण्यात आली होती. त्यातील दिग्गज नेत्याचा पराभव झाला आणि भाजपला मोठा धक्का बसला. यावर आज भाजप प्रदेशाध्यश चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त करत मेगाभरती भोवल्याचे कबुल केले.

चंद्रकांत पाटील आज पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाच्या मेळाव्यात नेते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी चंद्रकांत पाटलांनी मेगाभरती संबंधित आपली नाराजी बोलून दाखवली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली. पक्षात ‘दिल के करीब’ असलेल्यांना तिकिटं देण्यात आली, परंतु पक्षातील नेत्यांना तिकिट देण्यात आले नाही.

चंद्रकात पाटील पुढे म्हणाले की पक्षात बाहेरच्यांना संधी देण्यात आली परंतु पक्षातल्यांना तिकीट नाकारले. आपल्या आवडत्या माणसांना पद दिली गेली. तेच आपल्याला भोवलं. मेगाभरती भाजपला भोवली अशी स्पष्ट कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की महेश लांडगेंच्या डोळ्यातून पाणी आलं कारण त्यांना पक्षाचे तिकिट मिळाले. त्यांना बरं वाटलं की त्यांना तिकिटासाठी कोणाच्या मागे लागावे लागले नाही. हीच आपली संस्कृती आहे. परंतु मेगाभरतीमुळी संस्कृती मोडकळीस आली. ती संस्कृती नव्याने उभारण्याची आवश्यकता आहे. याकाळात लोकांच्या धारणा स्पष्ट केल्या पाहिजेत की पक्ष प्रेमावर चालतो, आपुलकीवर, मेरीटवर चालतो.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/