मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मेगा ब्लॉक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडुन द्रुतगती महामार्गावरील खंडाळा बोगदा (पुणे व मुंबई लेन) येथील कि.मी. 46.710 ते 46.579 दरम्यान ढिले झालेले दरडीचे दगड काढण्याचे काम उद्यापासून म्हणजेच (दि. 12 मार्च) पासून ते दि. 20 मार्च दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर (Express Way) मेगा ब्लॉक असणार आहे. याबाबतची माहिती पुणे प्रादेशिक विभागाचे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी आज (दि.११) पुन्हा दिली आहे. ४ दिवसापूर्वी महामार्ग पोलिसांकडून याबाबत सांगण्यात आले होते. आज पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मेगा ब्लॉक मध्ये कुठलाही बदल नाही असे सांगितले.

द्रुतगती महामार्गावर दि. 12 ते दि. 20 मार्च दरम्यान खालील वेळेत मेगा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक 1 :- सकाळी 10 ते सकाळी 10.15, ब्लॉक 2 :- सकाळी 11 ते सकाळी 11.15, ब्लॉक 3 :- दुपारी 12 ते दुपारी 12.15, ब्लॉक 4 :- दुपारी 2 ते दुपारी 2.15 आणि ब्लॉक 5 :- दुपारी 3 ते दुपारी 3.15. दरडीचे दगड काढण्याचे काम करताना पुणे व मुंबई लेन वरील वाहतुक दिवसभरातुन 5 वेळा 15 मिनिटाकरिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तसेच दि. 15 मार्च रोजी दुपारी 3.15 वाजल्यापासुन दि. 18 मार्च रोजी दुपारी 12 वाजपर्यंत वाहतुक चालु ठेवण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने प्रवास करणार्‍या सर्ववाहन चालंकानी व प्रवाशांनी या मेगा ब्लॉकची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी केले आहे.वाहन चालकांनी वेग मर्यादेचे आणि लेन नियमांचे पालन करावे असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.