शुक्रवारी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गवर मेगाब्लॉक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कायम रहदारी असलेला पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग हा अत्यंत महत्वाचा मार्ग असून शुक्रवारी तिथे कमान उभारण्याचं काम होणार असून उद्या दुपारी १२ ते २ तेथील वाहतूक पूर्णपणे ठप्प असणार आहे.
खालापूर टोलनाक्याच्या १७ किलोमीटर अगोदर कमान बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड यांच्या तर्फे करण्यात येणार आहे. या कामकाजामुळे मुंबई हुन किंवा अन्य ठिकाणावरून पुण्याकडे जाणारी संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली असून. पर्यायी मार्ग म्हणून शेडुंग फाटा येथून प्रवासी वाहनांना जात येणार आहे.

त्यामुळे सर्व वाहनचालकांनी शेडुंग फाटा-आजिवली चौक, दांड फाटा कर्जत या मार्गे खालापूर टोल प्लाझा येथून पुण्याकडे जात येईल.

दरम्यान या कालावधी वेळी अवजड मालवाहतूक वाहनांना हा मार्ग बंद असेल. अशी माहिती पनवेल विभागाचे पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी दिली.