Megha Dhade | Bigg Boss विजेत्या अभिनेत्रीने शिव आणि विणाच्या नात्याबद्दल केले ‘हे’ मोठे वक्त्यव्य

पोलीसनामा ऑनलाईन : Megha Dhade | सध्या हिंदी बिग बॉस आणि मराठी बिग बॉस टेलिव्हिजन वर धुमाकूळ घालत आहे. यातील घडणाऱ्या घडामोडी नेहमीच चर्चेत असतात. तर मराठमोळा शिव ठाकरेंनी हिंदी बिग बॉस मध्ये एन्ट्री घेताच खेळाची रंगत वाढल्याचे दिसत आहे. यामुळे शिवचे चाहते देखील अत्यंत खुश असल्याचे पाहायला मिळत आहे. शिव बिग बॉस मध्ये गेल्यापासून त्याचे प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्य मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याची आणि वीणा जगताप यांच्या नात्याची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. बिग बॉस मराठी च्या दुसऱ्या सीझनमध्ये हे कपल चाहत्यांच्या आवडीचे कपल होते. मात्र घराबाहेर पडताच त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण दोघांनीही यावर बोलणे टाळले होते. मात्र वीणाच्या एका पोस्टमुळे दोघांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आले होते. तर आता या लव बर्ड्स वर मराठी बिग बॉसच्या एका स्पर्धकाने भाष्य केले आहे. (Megha Dhade)

बिग बॉस मराठीची पहिली विजेती अभिनेत्री मेघा धाडे हिनेदेखील तिच्या खेळाने चाहत्यांचे मन जिंकले होते. एवढेच नाही तर मेघा ही बिग बॉसची खूप मोठी फॅन देखील आहे. मराठी बिग बॉस जिंकल्यानंतर तिने हिंदी बिग बॉस मध्ये देखील एंट्री केली होती. मात्र काही दिवसातच ती घराबाहेर पडली होती. मेघाने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत शिव आणि वीणा यांच्या नात्याबद्दल तिचे मत मांडले आहे. (Megha Dhade)

या मुलाखतीत मेघाला शिवच्या प्रवासाबद्दल विचारण्यात आले त्याचबरोबर शिव आणि अर्चना मधील भांडणाबद्दल देखील मेघाला विचारण्यात आले होते.
आणि त्यानंतर मेघाला शिव आणि वीणा यांच्या नात्याविषयी विचारण्यात आले यावर बोलताना मेघा म्हणाली,
“बिग बॉसच्या घरात शिवला वीणा आवडली होती त्याने तसेच जाहीरपणे कबूल देखील केले होते.
घराबाहेर पडल्यानंतर दोघांचे सगळे काही नीट चालू होते मात्र अचानकच दोघांच्या ब्रेकपच्या चर्चा सुरू झाल्या.
यावर मी जास्त काही बोलू शकत नाही. शिव बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर तुम्ही त्याला हे विचारू शकता.
मात्र एक गोष्ट नक्की आहे की शिव आणि वीणा यांचं नातं खूप छान आहे.
दोघेही एकमेकांना समजून घेतात गरजेच्या वेळी दोघे एकमेकांना मदत देखील करतात आणि शिवचे
सांगायचे झाल्यास टीव्हीवर दिसण्यासाठी शिव कधीच नाते जोडत नाही.
बिग बॉस संपल्यानंतर ही घरातल्या लोकांशी त्याने चांगली मैत्री टिकवून ठेवली आहे”.
मेघाच्या या बोलण्यावरून शिव आणि वीणा यांचा ब्रेकअप झालेला नाहीये असेच म्हणावे लागेल.
आता शिव आणि वीणा यांच्या लव्हस्टोरीत नक्की काय झालंय हे शिव ठाकरे बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरच कळणार आहे.

Web Title :-Megha Dhade | bigg boss marathi winner megha dhade talk about shiv thackeray and veena jagtap relation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Karnataka Border Issue | कर्नाटकमधील भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांना जाहीर आवाहन, म्हणाले – ‘सोलापूर, अक्कलकोटही…’

Milind Gawali :‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत