मेघा धाडेला मिळणार सरप्राईज गिफ्ट!

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनच्या भागात समावेश असलेली आणि विजेती ठरलेली मेघा धाडे हिला बिग बॉस कडून खूप मोठ गिफ्ट मिळालं आहे. बिग बॉसच्या घरात एंट्री झाल्यापासून मेघा धाडेची जोरदार चर्चा सुरु झाली होती. बिग बॉसच्या घरातील तिचं वागणं, सहकाऱ्यांशी होणारी भांडणं आणि वाद यामुळे मेघा धाडे हिचे नाव प्रत्येक रसिकाच्या ओठावर होतं. नुकतेच तिला बिग बॉस मराठीचं पहिल्या सिझनचं विजेतेपदाचा मान तिला मिळाला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार पहिल्या सिझनची विजेती ठरलेल्या मेघाला १८ लाख ६० हजार इतकी धनराशी तर मिळालीच त्याशिवाय निर्वाना लेजर रिअॅलिटी सिटी ऑफ म्युझिक ग्रुपकडून एक घरही भेट देण्यात आले आहे.ही सरप्राईज भेट तिला मिळाली आहे. असाच काहीसा खास प्लॅन बिग बॉसने देखील मेघासाठी केला होता. त्यामुळे बिग बॉसच्या घारबाहेर येताच मेघाच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही…. तिची अवस्थाही ‘आज मै उपर, आँसमा निचे’ अशी झाली आहे.

तसेच घराबाहेर येताच मेघाने केलेल्या खास बातचीत मध्ये सांगितले होते की,आजचा विजय मी माझ्या तमाम चाहत्यांना, माझ्या मायबाप प्रेक्षकांना समर्पित केला आहे. माझ्या आजच्या विजयात त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला नसता तर बिग बॉसची ट्राफी माझ्या हातात नसती. मला या घराने खूप काही शिकवले. याशिवाय या घरातील माणसांनी मला अनेक टिप्स दिल्या आहेत. त्याही मी अंगी बाणवल्या आहेत. ते आत्ताच सांगू शकणार नाही. पण होईल, इतके मात्र मी नक्की सांगेल बिग बॉसनंतर काही बंद झालेले मार्ग माझ्यासाठी उघडतील, याची मला खात्री आहे.
[amazon_link asins=’B07CRZJHKL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ffc7e33e-90cf-11e8-98d1-4fe720ae8770′]

शर्मिष्ठा राऊत म्हणाली की, ”बिग बॉस ‘च्या घरात राहणे सोपे नाही. इथे आल्यापासून मी कायमच स्वत:चा गेम खेळले. मेघा माझी चांगली मैत्रीण आहे. या घराने मला खूप काही शिकवले. घरात आले तेव्हा जिंकूनच बाहेर पडेन असे वाटले होते. ‘आस्ताद काळे म्हणाला की, ‘ या घराने माझ्यात खूप मोठा बदल घडवून आणला. काहीही बोलण्याआधी, कृती करण्याआधी दहा वेळा विचार करण्याची सवय या घरामुळे मला लागली. सईने सांगितले की, ‘या घराने मला मेघा व पुष्कर हे दोन मित्र दिले. घरात आले तेव्हा शंभर दिवस राहणार हा निर्धार करून आले होते. त्याप्रमाणे या घरात मी शंभर दिवस राहिले.’ पुष्करने आज तो या ठिकाणी केवळ आपल्या आई वडिलांमुळे असल्याचे सांगितले.