मेघा धाडे म्हणते,हा विजय माझ्या चाहत्यांचाच………

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

मराठी बिग बॉस मध्ये मेघा धाडे विजेती ठरली आहे. फायनल मध्ये तिने पुष्कर जोगवर मात करत तिने बिग बॉस ची ट्रॉफी उंचावली. मेघा धाडे ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची पहिली विजेती ठरली. मला स्वतःला विश्वास बसत नाही कि मी हि स्पर्धा जिंकली मनात एक विश्वास आणि आशा घेऊन मी बिग बॉस च्या घरात पाऊल ठेवले. आणि आज ते प्रत्यक्षात उतरले. घरात प्रवेश केला होता तेव्हा माझ्यासमोर १८  दिग्गजांची फौज समोर होती. मी त्यांच्यात स्वत:ला खूपच नवखी समजत होते. मी घाबरले होते. पण म्हंटल कि, जेव्हा खूप इम्पॉसिबल चित्र दिसतं, तेव्हाच ते पॉसिबल करण्यात आयुष्याची मजा असते, असं मेघाने म्हंटल आहे.

आजचा विजय मी माझ्या तमात चाहत्यांना, माझ्या मायबाप प्रेक्षकांना समर्पित करेल. त्यांच्याचमुळे मी इथे पोहोचलीय. माझ्या आजच्या विजयात त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला नसता तर बिग बॉसची ट्राॅफी माझ्या हातात नसती. खूप साऱ्या आठवणी, सगळे सदस्य, त्यांची मैत्री, जिवा-भावाचे मित्र हे सगळे मी इथून घेऊन जातेय. शिवाय प्रेक्षकांचे प्रेम मला इथे येऊन मिळाले.हा विजय समर्पित करताना म्हणाली.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c57d3f55-8e44-11e8-97f3-65a33953446e’]

मला या घराने खूप काही शिकवले. मी आत्मपरिक्षण करायला शिकले, हा माझ्यातील सगळ्यांत मोठा बदल. याशिवाय या घरातील माणसांनी मला अनेक टिप्स दिल्या आहेत.करियर बाबत बोलताना ती म्हणाली कि बिग बॉसचा करियर साठी चांगला फायदा होईल म्हणूनच मी सामील झाले होते.करियर बाबत ते मी आत्ताच सांगू शकणार नाही. बिग बॉसनंतर काही बंद झालेले मार्ग माझ्यासाठी उघडतील, याची मला खात्री आहे.

मेघा म्हणाली, “मला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं हे एकाच दिवशी वाटलं. शंभर दिवसातला एक दिवस वाटलं बाहेर जावं. ज्यांच्यासाठी मी कधी कधी माझा गेम कॉम्प्रमाईज केला. माझे जीवलग मित्र –मैत्रिण पुष्कर आणि सई यांनी मला जेव्हा विश्वासघातकी बोलले, तेव्हा मात्र मी तुटले होते. त्याच दिवशी आत्ताच्या आता घर सोडावं असं वाटलं पण ते दोघेही माझे खास मित्र होते आणि कायम राहतील.
जाहिरात