Megha Kirit Somaiya | मेघा सोमय्या यांच्याकडून संजय राऊतांवर 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल; जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Megha Kirit Somaiya | भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेघा किरीट सोमय्या (Megha Kirit Somaiya) यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा (Defamation Case) दाखल केला आहे. कोर्टाची सुट्टी संपली की किरीट सोमय्या यांचे वकील याचिका कोर्टासमोर सादर करणार आहेत.
मेघा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा (Toilet Scam) केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर या आरोपाचे पुरावे द्यावेत असे थेट आव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिले होते. परंतु संजय राऊत यांनी कोणतेही पुरावे (Evidence) न दिल्याने मेघा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. (Megha Kirit Somaiya)
राऊतांचा आरोप निराधार आणि निंदनीय
मेघा सोमय्या यांनी प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि निंदनीय असल्याचे म्हटलं होतं. आपली प्रतिमा खराब करण्यासाठी ते अशी विधाने करत आहेत. मीरा भाईंदर महापालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामात मेघा सोमय्या आणि त्यांच्या पतीने 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
Medha Kirit Somaiya filed Rs100 Crore Defamation Suit against Shivsena Sanjay Raut today Mumbai High Court.
मेधा किरीट सोमैयानी आज मुंबई उच्च न्यायालय येथे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर 100 कोटींचा दिवाणी मानहानीचा दावा दाखल केला @BJP4India pic.twitter.com/UFlwVIwxz1
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 23, 2022
एक रुपयाचाही घोटाळा झाला नाही
संजय राऊत यांना यापूर्वीच मानहानी, बदनामीची नोटीस दिली आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात (Mulund Police Station) तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. एक रुपयाचा घोटाळा झालेला नसताना, एक रुपयाचा घोटाळाचे पुरावे/कागदपत्र नसताना संजय राऊत यांनी फक्त भीतीसाठी, बदनाम करण्यासाठी हा अपप्रचार केला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना माफी मागावी लागणार?
संजय राऊत यांच्या विरोधात मानहानिचा दावा दाखल केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, खोटी प्रसिद्धी मिळावी यासाठी संजय राऊत बिनबुडाचे आरोप (Allegations) करीत आहेत. त्यामुळे आता त्यांना आणि मुख्यमंत्र्यांना (CM) माफी मागावीच लागणार आहे. त्यांना त्यांच्या पापाचे फळ मिळणार. ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे सरकार (Uddhav Thackeray Government) गुंडगिरी करतं. घोटाळे करतं आणि स्वाक्षरी शिवाय एफआयआर (FIR) नोंदवतं. मागील 12 महिन्यांपासून भाजप सातत्याने उद्धव ठाकरे सरकारचे घोटाळे उघड करत आहे, त्यामुळे शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे.
Web Title : Megha Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya’s-wife megha somaiya claim 100 crore against sanjay raut
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर