Lockdown : राज्यात फक्त 12 ‘कोरोना’बाधित, तरीदेखील मुख्यमंत्र्यांची ‘लॉकडाऊन’ वाढविण्याची इच्छा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे आणि मे नंतर मुदतवाढ द्यावी की नाही, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत मंथन केले. पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनीही पंतप्रधानांना लॉकडाऊनबाबत आपले मत सांगितले.

कोनराड संगमा म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 3 मेनंतरही मेघालयात लॉकडाऊन चालू ठेऊ इच्छित आहे. तथापि, संगमा यांनी असेही म्हटले आहे की, जे भाग ग्रीन झोनमध्ये आहेत किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित नाहीत , त्यांना थोडा दिलासा मिळाला पाहिजे.

महत्वपूर्ण बाब म्हणजे मेघालय हे देशातील असे राज्य आहे जिथे कोरोनाबाधित रुग्नांची संख्या कमी आहे. म्हणजेच मेघालयची याबाबतीत स्थिती चांगली आहे. २६ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मेघालयात कोरोना रूग्णांची संख्या अवघी १२ होती तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला.

मेघालय खालोखाल गोवा, पुडुचेरी, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम ही एकमेव अशी छोटी राज्ये आहेत जिथे कोरोनाचा सर्वात कमी प्रभाव दिसून येतो. असे असूनही, कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याच्या बाजूने मेघालयचे मुख्यमंत्री आहेत. मेघालयव्यतिरिक्त ओडिशानेही लॉकडाऊन वाढविण्यास सहमती दर्शविली आहे.

केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की ही दीर्घ लढाई आहे आणि लॉकडाऊन योग्य पद्धतीने पाळले पाहिजे. त्याचबरोबर या व्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या वतीने असेही म्हटले आहे की लॉकडाऊनमध्ये मदत कशी दिली जाऊ शकते याविषयी राज्यांनी आपापले धोरण तयार करावे.

असे सांगितले जात आहे की ज्या भागात कोरोनाचा त्रास होत नाही तेथे आर्थिक बाब लक्षात घेऊन लॉकडाउनमधून दिलासा मिळू शकतो. कोरोना संक्रमित भागात लॉकडाउन सुरू ठेवता येते. तथापि, ३ मे नंतर लॉकडाऊन वाढल्यास त्याचे स्वरूप काय असेल, हे वास्तव चित्र पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणानंतरच स्पष्ट होईल.