CAB : पटत नाही तर उत्तर कोरियात चालते व्हा ! मेघालयाच्या राज्यपालांनी सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भाजप नेत्यांनी मोदी सरकारचा निर्णय पटत नसेल, त्याला विरोध असेल तर पाकिस्तान जा असा सल्ला अनेकदा दिल्याचे आपण ऐकले आहे. परंतू आता त्याही पुढे जाऊन मेघालयचे राज्यपाल आणि पश्चिम बंगाच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रॉय यांनी मोठा सल्ला दिला आहे. आता तर नागरिकत्व विधेयकाला विरोध करणाऱ्यांना त्यांनी उत्तर कोरियात चालते व्हा असा सल्ला दिला आहे.

रॉय यांनी ट्विट केले की,सध्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन गोष्टी कधीही विसरता कामा नयेत.

1. धर्माच्या नावावर भारताची एकदा फाळणी झाली आहे.
2. लोकशाहीमध्ये विरोधी मतप्रवाह असणारच. ते तुम्हाला नको असतील, तर तुम्ही उत्तर कोरियात चालते व्हा.

अनेक विरोधानंतर अखेर लोकसभेत, राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक संमत झाले. यानंतर ईशान्य भारतात हिंसाचार उफाळून आला. अनेक आंदोलकर्ते रस्त्यावर उतरले. शुक्रवारी जेव्हा राजभवनावर आंदोलन सुरु होते तेव्हा तथागत रॉय यांनी हे ट्विट करत उत्तर कोरियात जाण्याचा सल्ला दिला.

उत्तर कोरिया किम जोंग उन हे हुकूमशाह म्हणून ओळखले जातात. ईशान्य भारतीयांची शारीरिक ठेवण जवळपास चीनी, जपानी, कोरियन प्रकारचा आहे. शास्त्रीय परिभाषेत त्याला मंगोलाइड ठेवणीचे शरीर म्हणतात. ईशान्य भारतीयांना या टोमण्याचा अनेकदा सामना करावा लागतो. परंतु खूद राज्यपालांनीच असे विधान करणे कितपित शोभनीय आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/