सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर, मेघना श्रीवास्तव पहिली

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेशातील स्टेप बाय स्टेप महाविद्यालयातील मेघना श्रीवास्तव हीने बोर्डात पहिला नंबर पटकावला आहे. तिला 500 गुणांपैकी 499 गुण मिळाले आहेत.

यावर्षी इयत्ता बारावीची परीक्षा दि. 5 मार्च ते 13 एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेत 83.01 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी परीक्षेसाठी देशभरातून सुमारे 11 लाख 86 हजार विध्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

मंडळाच्या www.cbseresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.