कठुआ गँगरेप केस : दोषींच्या शिक्षेवर मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला म्हणतात..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधील कठुआ येथे झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात ७ पैकी पाच जणांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. पठाणकोटमधील न्यायालायने त्यांना दोषी ठरवले आहे. सुप्रीम कोर्टाने या खटल्याची सुनावणी जम्मू आणि काश्मीर बाहेर घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पठाणकोट येथील सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी घेण्यात आली होती.

त्यानंतर यावर आता विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांनी यावर ट्विट करत न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मुफ्ती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे कि, या निर्णयाचे मी स्वागत करते. हि वेळ अशा घटनांवर राजकारण करण्याची नाही. मला आशा आहे कि, भारतीय न्याय व्यवस्थेतील त्रुटींचा फायदा घेऊन कोणताही आरोपी यातून सुटू नये हि अपेक्षा. आरोपींना अशी शिक्षा मिळायला हवी ज्यामुळे दुसऱ्यांना देखील गुन्हा करताना याचा दहावेळा विचार करावा लागेल.

त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील ट्विट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे कि,दोषींना कडक शिक्षा व्हायला हवी. तसेच ज्या राजकारण्यांनी या विषयावर राजकारण केले त्यांच्यासाठी हा निर्णय एक शिक्षा आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ आरोपीना अटक केली होती. यातील पाच जणांना न्यायालयाने दोषी ठरवले असून बाकी दोन जणांना निर्दोष सोडले आहे. मुख्य आरोपी सांजी राम, त्याचा मुलगा विशाल, दीपक खजुरिया, सुरेंदर वर्मा, आणि टिळक राज या पाच आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले आहे. या संपूर्ण खटल्यात न्यायालयाने १४४ साक्षीदार तपासले होते.

या प्रकरणात एक आरोपी अल्पवयीन असून त्याचे प्रकरण जम्मूकाश्मीरमधील न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचबरोबर या प्रकरणात मुलीची वकील असणाऱ्या दीपिका सिंह यांना देखील मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास देण्यात आला.

आरोग्य विषयक वृत्त

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या आहेत ? घरीच बनवा अँटी एजिंग फेसपॅक

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज