यासिन मलिकला तत्काळ सोडा ; मेहबूबा मुफ्तींना फुटिरतावाद्यांचा पुळका

नवी दिली : वृत्तसंस्था – जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख फुटरवादी नेता यासीन मलिक याची तात्काळ सुटका करण्याची मागणी जम्मू काश्मीरच्या माजि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. टेरर फॅनडींग प्रकरणी यासिन मलिकला अटक करण्यात आली आहे. मेहबुबा यांनी यासीन बरोबरच सर्व फुटारवाद्यांची सुटका करण्याची मागणी देखील केली आहे. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

याबाबत बोलताना मेहबुबा म्हणाल्या की, “यासिन मलिक याची तब्येत ठीक नाही. त्याला तात्काळ सोडा. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर अनेक आरोप असतानाही त्यांना सोडण्यात आले होते. तसेच जमात -ए -इस्लामिच्या सदस्यांची देखील सुटका करा. अशी मागणी मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. पुलवामा यथे पत्रकरांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.

दरम्यान जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक याच्या न्यायालयीन कोठडीत आज दिल्लीच्या पतियाळा न्यायालयाने वाढ केली आहे. यासिनची २४ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आज यासिनला व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.