मेहबूबा मुफ्तीना दहशतवादी मन्नान वाणीसाठी मायेचा पाझर

श्रीनगर : वृत्तसंस्था

मेहबूबा मुफ्ती यांना आता दहशतवादी मुन्नान वाणीसाठी मायेचा पाझर फुटला आहे. त्यांनी दहशतवादी मन्नान वाणी याचा उल्लेख चक्क पीडित असा केला आहे. वाणी काश्मीर हिंसाचारातील पीडित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे. अलीगढ मुस्लीम विद्यापीठात देशद्रोहाच्या आरोपाखाली निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याची मागणीही मुफ्ती यांनी केली आहे. या विद्यार्थ्यांच्या पाठीशी पक्ष उभा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b8d9b293-d100-11e8-92b5-050343b9ad7c’]

पीएचडी केलेल्या मन्नान वानी दहशतवादी संघटना हिजबुल मजाहिद्दीनमध्ये दाखल झाला होता. सुरक्षा दलाने ११ ऑक्टोबरला झालेल्या एका चकमकीत त्याचा खात्मा केला. त्यानंतर अचणत शिकणाऱ्या काश्मीरी विद्यार्थ्यांनी वानीच्या मृत्यूसंदर्भात शोकसभेचे आयोजन केले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यावेळी देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप आहे. देशविरोधी घोषणाबाजीच्या आरोपाखाली ७ काश्मीरी विद्यार्थ्यांवर लावण्यात आलेल्या देशद्रोहाचे आरोप मागे घेण्यात यावे, अन्यथा विद्यापीठ सोडून निघून जाऊ अशी धमकी अचणत शिकणाऱ्या १२०० विद्यार्थ्यांनी दिली आहे. १२०० काश्मिरी विद्यार्थ्यांनी अचण सोडून जाण्याचा पवित्रा घेणे ही गंभीर बाब असून अचणचे कुलगुरु, शिक्षण, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा मुद्दा सोडवायला हवा, अशी मागणी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.