‘या’ महिला नेत्याला अद्यापही पाकिस्तानचा पुळका 

श्रीनगर : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तान विरोधात भारताने आज मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर भारतीय हवाई दलावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच सर्व भारतभर आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मात्र जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सर्जिकल स्ट्राईकनंतरही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सर्जिकल स्ट्राईकवर आनंद व्यक्त करणं हे मुर्खपणाचं असल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे.

धर्म व जात, ओळख याआधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न
मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘अशिक्षित लोकं या युद्धाचा आनंद व्यक्त करत आहेत. या दुखाच्या वेळी लोकांना विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्म व जात, ओळख या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. झाड कापल्यानंतर कुऱ्हाड तिने केलेला हल्ला विसरते मात्र झाडाला ते कायम लक्षात राहतं, असे मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट केले.युद्ध व गोळीबार करून सामान्य नागरिकांना त्रास देण्याला माझा विरोध आहे. जर या विरोधामुळे माझ्या देशप्रेमावर प्रश्न उपस्थित केले जात असतील तर मला चालेल. मी युद्धाला पाठिंबा देण्यापेक्षा शांतता व सामान्य नागरिकांचे प्राण वाचविण्याला पाठिंबा देईन.’ दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून  संताप व्यक्त करत नेटकरी त्यांना ट्रोल करू लागले आहेत.

इम्रान खान यांना एक संधी द्या
यापूर्वी पुलवामा हल्ल्यानंतर मेहबूबा मुफ्ती पाकिस्तानशी चर्चा करा असे बरळल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, ‘पठाणकोट हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी गुन्हेगारांना शिक्षा द्यायला हवी होती. पण, तसे केले नाही. तरी सुद्धा त्यांना एक संधी द्यायला हवी. ते आताच सत्तेवर आले आहेत. इमरान खान हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान आहेत. आपण आता त्यांना पुरावे देऊ व बघू ते काय करतात पाकिस्तानसोबत चर्चा झाली पाहिजे.’