पहिली पत्नीच करणार अर्जुनच्या गर्लफ्रेंडचं डोहाळजेवण

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल सध्या वेगळीच केमिस्ट्री चालू आहे. अर्जुन आणि त्याची पत्नी मेहर जेसिया यांचा अद्याप कायदेशीररित्या घटस्फोट झाला नसून देखील अर्जुन गॅब्रएलसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.

मेहेर हिने मिस इंडिया चा किताब पटकावला आहे. हे दोघे २० वर्षांपुर्वी लग्नाच्या बेडित अडकले. या दोघांमधील मतभेद वाढू लागल्याने त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सध्या अर्जुन गॅब्रएलला डेट करत असल्याचे समजले आहे.

अर्जुन आणि मेहेर यांचा अद्याप घटस्फोट झाला नाही. तरी देखील अर्जुन गॅब्रएलसोबत रिलेशनशिप मध्ये आहेत. आणि हे दोघे फक्त रिलेशनशिप मध्ये नसून गॅब्रएल प्रेग्नेंट सुद्धा आहे. आणि आता तिचे डोहाळेजेवण करण्यासाठी अर्जुनची पत्नी मेहेर खुप उत्सुक असल्याची चर्चा खुप पसरत आहे.

एका वृत्त संस्थेच्या माहितीनुसार गॅब्रएलाचे लवकरच बेबीशॉवर करण्यात येणार आहे. यासाठी मेहेर खुपच उत्सुक आहे. ग्रॅब्रएलच्या बेबीशॉवरची जबाबदारी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर सोपवण्यात आली आहे त्याचा एक भाग मेहर आहे. त्यामुळे ग्रॅब्रएलच्या बेबीशॉवरच्या इव्हेंटमध्ये मेहेरचे महत्वाचे योगदान आहे. मुंबईमधील बांद्रा येथे हा कार्यक्रम होणार आहे. या दोघांच्या नात्याबद्दल मेहेर म्हणाली की, ग्रॅब्रएलच्या प्रेग्नेंसीविषयी मला कोणतीच तक्रार नाही.

जेव्हा अर्जुन आणि मेहेर यांचा दोघांमधील मतभेद वाढू लागला यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा अर्जुन ने एक पाऊल पुढे टाकले व अर्जुनने गॅब्रएलला डेट करण्यास सुरुवात केली.