Coronavirus : दिल्लीत जेवण देत होते AAP आमदाराचे कार्यकर्ते, निघाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली  :  वृत्तसंस्था –   आम आदमी पार्टी (आप) च्या दिल्लीतील मेहरौली येथील आमदार नरेश यादव यांचे दोन प्रतिनिधी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे आणि कोरोना बाधित भागात सील करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आम आदमी पक्षाचे आमदार लॉकडाऊन दरम्यान गरीब आणि मजुरांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

आमदार नरेश यादव यांचे प्रतिनिधीही परिसरातील गरजू लोकांना अन्न वाटप करीत होते. मेहरौलीच्या पहलवान ढाब्याच्या आसपासचा परिसर, ज्यामध्ये सुमारे 1000-1500 घरे आहेत, ते कंटेनमेंट झोनमध्ये आहेत. आमदार नरेश यादव यांचे प्रतिनिधी परिसरातील गरजू लोकांना वस्तू वाटप करीत होते. सोमवारी चाचणीनंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.

दिल्लीमध्ये आतापर्यंत 97 कंटेनमेंट झोन

दिल्लीतील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या गंभीर परिस्थितीमुळे तेथे ठिकठिकाणी कंटेन्ट झोन तयार केले जात आहेत. दिल्लीतील हॉटस्पॉट-कंटेनमेंट झोनची संख्या वाढून 97 झाली आहे. या भागातील लोकांना बाहेर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. सर्व दुकाने बंद आहेत. दरम्यान, दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. राजधानीत कोरोना रुग्णांची संख्या वाढून 2,918 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 54 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 877 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.