मेहुल चोकसीने भारतीय नागरिकत्व सोडले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साडेतेरा हजार कोटी रुपयांच्या पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि निरव मोदीचा मामा मेहुल चोकसीने भारतीय नागरिकत्व सोडले आहे. चोकसीने आपला भारतीय पासपोर्ट अँटिग्वा उच्च आयोगात जमा केलं आहे. याचाच अर्थ आता चोकसीला भारतात आणणे आणखी कठीण झाले आहे. भारत सरकारला हा मोठा धक्का आहे.

मेहुल चोकसीने पासपोर्ट नंबर झेड 3396732 कॅन्सल्ड बुकसोबत जमा केला आहे. नागरिकत्व सोडण्यासाठी चोकसीने १७७ अमेरिकन डॉलरचा डीडीही जमा केला आहे.

प्रत्यार्पणाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मेहुल चोकसीने भारतीय नागरिकत्व सोडले आहे. याबाबत अँटिग्वा कोर्टात२२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालय आणि तपास यंत्रणांकडे या प्रकरणाचा प्रगती अहवाल मागितला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमित नारंग यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला याची माहिती दिली. नागरिकत्व सोडण्याच्या अर्जावर चोकसीने त्याचा नवा पत्ता जॉली हार्बर सेंट मार्कस अँटिग्वा, असा लिहिला आहे. मी नियमानुसार अँटिग्वाचे नागरिकत्व स्वीकारले असून भारताचं नागरिकत्व सोडले आहे, असे चोकसीने उच्च आयोगाला सांगितले आहे.

प्रकाश आंबेडकर ‘या’ अटीवर काँग्रेसशी आघाडी करायला तयार

मेहुल चोकसी हा गीतांजली जेम्स कंपनीचा मालक आहे. गीतांजली जेम्स ही कंपनी जगभरात हिरे निर्यात करते. देशात गीतांजली जेम्सचे अनेक शो रुम होते. मेहुल चोकसी हा आणखी एक आरोपी नीरव मोदीचा मामा आहे. मेहुल चोकसी-नीरव मोदी पीएनबी घोटाळ्याचे आरोपी आहेत. घोटाळ्यानंतर दोघेही देश सोडून फरार झाले आहेत. मेहुल चोकसी सध्या अँटिग्वामध्ये राहत आहे.

फेब्रुवारी २०१८ में पीएनबी घोटाळा उघड झाला होता. पीएनबी घोटाळ्यात १३ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गैरव्यवहार झाला होता़ नीरव आणि मेहुलने लेटर ऑफ अंडरटेकिंग्जद्वारे बँकांमधून पैसा घेऊन परदेशात ट्रान्सफर केला होता. पीएनबीचे काही कर्मचाºयांना कथितरित्या नीरव मोदीच्या कंपन्यांना लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज जारी केले होते. हे लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज एकप्रकारची क्रेडिट नोट होती़ मेहुलने गीतांजली कंपनीद्वारे हजारो कोटी रुपयांची रक्कम इटली, जपान, थायलंड, अमेरिका, यूएई, यूके आणि बेल्जियममध्ये पाठवली होती. चोकसीने हाँगकाँगमध्ये ६, दुबईत ९ डमी कंपन्या बनवल्या होत्या. या कंपन्यांचे काम केवळ पैसे इथून तिथे पाठवणे हेच होते.