अंडरवर्ल्ड डॉन ‘दाऊद’नंतर बिलावल भुत्तोसोबत नाव जोडल्यानं प्रचंड संतापली ‘ही’ अभिनेत्री !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पाकिस्तानी अ‍ॅक्ट्रेस मेहविश हयात (Mehwish Hayat) हिचा एक जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशलवर व्हायरल झाल्यानं ती चर्चेत आली आहे. यात तिला कशा प्रकारचा जोडीदार हवा आहे, हे सांगताना दिसत आहे. रविवारी (दि. 29 नोवेंहर) तिनं ट्विट करत माध्यमांवर जोरदार टीका केली.

मेहविशचं नाव बिलावल भुत्तो झरदारीशी जोडण्यात आलं. बिलावल हा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचा मुलगा आहे. याआधीही मेहविशचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत जोडण्यात आलं होतं. आता तिनं माध्यमांवर निशाणा साधला आहे.

मेहविश ट्विट करत म्हणाली की, माझ्या 2 वर्षे जुन्या मुलाखतीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. अनावश्यक हेडलाइन्स बनवल्या गेल्या. मी कोणाबरोबर लग्न करायचं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा लोकांना समजेल. तोपर्यंत गप्प बसा. जोड्या जुळवू नका असंही तिनं सांगितलं आहे.

याआधीही मेहविशचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत जोडण्यात आलं होतं. दाऊदपेक्षा ती 27 वर्षांनी लहान आहे. काही लोक तर तिला गँगस्टर गुडीया नावानंही ओळखतात.

पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार, दाऊदशी संबंध असल्यानंच तिला अनेक सिनेमात काम मिळालं आहे. अशा अ‍ॅक्ट्रेससाठी दाऊद सिनेमात प्रचंड पैसा गुंतवतो असंही बोललं जात आहे.

तिची थेट पंतप्रधानांपर्यंत ओळख असल्यानं मागील वर्षी देशातील नागरी पुरस्कारांपैकी एक तमगा-ए-इम्तियाज हा पुरस्कार तिला देण्यात आल्याचंही बोललं जात आहे.

 

You might also like