राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर कसे आहेत ट्रम्प ? पत्नी मेलानियाने सांगितले

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसचा निरोप घेतल्यानंतर आता अनेक आठवडे उलटले आहेत. 20 जानेवारीला जो बायडेन यांच्या शपथग्रहण सोहळ्याच्या काही तास अगोदरच ट्रम्प फ्लोरिडामध्ये मार-ए-लागो येथील आपल्या निवास्थानी गेले होते. तेव्हापासून ट्रम्प आपल्या कुटुंबासह तिथेच राहात आहेत. ट्रम्प यांच्या माजी सल्लागाराने मेलानिया ट्रम्प यांच्या संदर्भाने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष पद गेल्यानंतर त्यांच्या जीवनात किती बदल झाला आहे.

ट्रम्प यांच्या एका माजी कॅम्पेन मॅनेजरनुसार, अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांना वाटते की, ट्रम्प व्हाईट हाऊसच्या दिवसांच्या तुलनेत आता जास्त आनंदी आहेत. तर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प या गोष्टीसाठी सुद्धा खुश आहेत की ते आता ट्विटरवर नाहीत.

’संडे टाइम्स’ला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी आणि कॅम्पेन मॅनेजर असलेले जेसन मिलर यांनी सांगितले की, महाभियोग ट्रायल असूनही इतक्या वर्षानंतर ट्रम्प यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसत आहे.

मिलर म्हणाले, अमेरिकन इतिहासात केवळ 45 लोक झाले आहेत ज्यांना माहित आहे की, संपूर्ण जगाचे ओझे खांद्यावर घेवून फिरणे कसे असते… जेव्हा तुम्हाला चार वर्षानंतर पहिल्यांदा हे समजते की, आता सर्वकाही तुमची जबाबदारी नाही तेव्हा हायसे वाटते.

मिलर यांच्यानुसार, ट्रम्प यांनी म्हटले की, सोशल मीडियावर नसणे आणि द्वेषाने भरलेल्या इको चेम्बरचा (जे सोशल मीडिया अनेक प्रसंगी बनत असते) विषय नसणे, प्रत्यक्षात चांगले आहे. ट्रम्प यांच्या ट्विटरवर सुमारे 8 कोटी 80 लाख फॉलोअर्स होते. त्यांना काही आठवडे अगोदर मायक्रोब्लॉगिंग साईटवरून हटवण्यात आले होते. कॅपिटल हिलमध्ये 6 जानेवारीला त्यांच्या समर्थकांनी उच्छाद मांडल्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांच्याविरूद्ध कारवाई केली होती.

मिलर यांच्यानुसार, नव्या वातावरणात मेलानिया ट्रम्पसुद्धा आनंदी आहेत. मेलानिया यांनी म्हटले की, ट्रम्प आता जास्त आनंदी आहेत आणि पहिल्याच्या तुलनेत जास्त एन्जॉय करत आहेत. मिलर यांनी म्हटले की ते पुर्णपणे आश्वस्थ आहेत की ट्रम्प महाभियोगात दोषी ठरणार नाहीत.