डोनाल्ड ट्रम्प यांना डबल झटका ? राष्ट्राध्यक्षपद जाताच आता पत्नी घटस्फोटाच्या तयारीत

पोलिसनामा ऑनलाईन – अख्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडेन (Joe Biden ) यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांच्या दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदावर बसण्याच्या महत्त्वकांक्षेवर पाणी फेरल गेले आहे. पण असे असतानाच ट्रम्प यांना आणखी एक कौटुंबिक धक्का बसण्याची शक्यता आहे. डेल मेल या वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांना मलेनिया ट्रम्प ( Melania Trump -Divorce Rumor) घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त दिले आहे. मलेनिया ट्रम्प यांच्या एका पूर्व सहयोगीच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

स्टेफनी वोल्कॉफनच्या हवाल्याने डेल मेलने हे वृत्त दिल्याचे समजते. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांच्यात 15 वर्षापूर्वी सुरु झालेले नाते संपुष्टात येत आहे. दोघांच्या नात्याला तडा गेला आहे. व्हाइट हाउसमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प वेगवेगळ्या खोल्यामध्ये वास्तव्यास आहेत. मेलेनिया ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये घटस्फोट आणि लग्नासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहेत. यात मेलेनियाने मुलगा बॅरेनचा ताबा आणि संपत्तीत अर्धा वाटा मागितला आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउस सोडताच दोघांमध्ये घटस्फोट होऊ शकतो. मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्पच्या लग्नाला स्टेफनी वोल्कॉफन ट्रंजेक्शनल असे म्हटले आहे.

याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय सहयोगी ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅन यांनीही दोघांच्या नात्यात तडा गेल्याचे म्हटले आहे. ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅन म्हणाल्या की, 15 वर्षांपासून एकत्र असणाऱ्या ट्रम्प दाम्पत्यांच्या नाते संपुष्टात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउसमधून बाहेर पडताच मेलेनिया घटस्फोट देईल. डोनाल्ड ट्रम्प यांचा बदला घेण्यासाठी मेलेनिया ट्रम्प सध्या रस्ता शोधत आहे.

दोघांची कशी झाली होती भेट
1998 मध्ये मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले होते. त्यावेळी ट्रम्प यांचे वय 52 होत तर मेलेनिया याचे वय 28 होते. त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये फॅशन वीक सुरु होता त्यानंतर टाइम्स स्क्वेअरच्या किटकॅट क्लबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर 2004 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी 1.5 मिलिअन डॉलरची डायमंड रिंग मेलेनियाला देत लग्नाची मागणी केली होती. 22 जानेवारी 2005 मध्ये दोघांनी लग्न केले होते.