‘कोरियोग्राफर’ मेल्विन लुईसनं दिलं अभिनेत्री सना खानच्या आरोपांना ‘प्रत्युत्तर’, शेअर केलं फोन रेकॉर्डिंग

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि बिग बॉसची माजी स्पर्धक सना खान आणि एक्स बॉयफ्रेंड कोरियोग्राफर मेल्विन लुईसच्या ब्रेकअपच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होताना दिसत आहे. सनानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मेल्विननं तिला धोका दिल आहे. तिनं ब्रेकअपची घोषणाही केली होती. यानंतर आता दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. यानंतर सनानं सांगितलं की, त्यानं तिला चीट केलं इतर मुलींनाही डेट केलं आहे. या सगळ्यानंतर आता मेल्विन लुईसनं यावर रिअ‍ॅक्ट होतं इंस्टावरून एक फोन रेकॉर्डिंग शेअर केलं आहे. सध्या हे रेकोर्डिंग सोशलवर व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/B9ZeBDGl_-Z/

मेल्विननं शेअर केलेल्या फोन रेकॉर्डिंगमध्ये सना म्हणते, मला तुझा अपमान करावा लागला. मुद्दा हा होता की, मला सार्वजनिक स्तरावर चांगलं वाटून घ्यायचं होतं. यावर मेल्विन म्हणतो, मला पूर्ण विश्वास आहे की, हा तुझा इरादा होता. यावर सना म्हणते, होय हा माझा इरादा होता.

फोन रेकॉर्डिंग शेअर करताना मेल्विन म्हणतो, “तू माझी खिल्ली उडवली. तू माझी जात आणि माझ्या स्किनवरूनही माझी थट्टा केलीस. तू माझ्या कुटुंबाचीही खिल्ली उडवलीस. चुकीचे आरोप करत माझ्या आवडत्या लोकांचीही खिल्ली उडवलीस. तू तुझं सर्वश्रेष्ठ करण्याचा प्रयत्न केला. आता तुला सार्वजनिक स्तरावर छान वाटत असेल.”मेल्विनच्या या खुलाश्यानंतर सारेच हैराण झाले आहेत. अद्या सना खानची अद्याप यावर काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.