PM मोदी डिस्कव्हरीवर झळकणार, नेटकऱ्यांची ‘विनोदबुद्धी’, ‘मिम्स’ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी डिस्कव्हरी चॅनेलवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमामध्ये झळकणार आहेत. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेअर ग्रिल्ससोबत नरेंद्र मोदी दिसणार आहेत. या संबंधीचा व्हिडीओ ग्रिल्सने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. दरम्यान, या संबंधी वृत्त सर्वत्र वेगाने व्हायरल होताच. या बातमीवर सोशलमिडीयात मजेशीर चर्चा रंगली. अनेक प्रतिभावंतांच्या विनोदी बुद्धीला या बातमीने चालना दिली. एखादी प्रसिद्ध घटना आणि त्या संबंधी निर्माण होणारे मिम्स हे आता नवीन राहील नाही. मोदींच्या या बातमीनंतरही अनेक मिम्स व्हायरल झाले. नेटकऱ्यांनी ट्विटर, फेसबुकवरून हे मजेशीर मिम्स शेअर केले.

https://twitter.com/ZarahKhatoon/status/1155779333224402944

ट्विटरवर या कार्यक्रमासंदर्भातील #PMModionDiscovery हा हॅशटॅग पहिल्या क्रमांकावर तर Bear Grylls हा टॉपिक चौथ्या क्रमांकावर ट्रेण्ड होत आहे. हेच हॅशटॅग वापरून अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, बेअर ग्रिल्स, डिस्कव्हरी, मोदींचे विरोधक अशा सर्वांनाचा ट्रोल केले आहे. या टिझरमधील अनेक स्क्रीनशॉर्टसचे काही तासांमध्ये मिम्समध्ये रुपांतर झाले आहे.

https://twitter.com/GovindD20489906/status/1155775206272561154

 

आरोग्यविषयक वृत्त –