कलम 370 ! मै ‘पूछने नहीं, बताने आया हूं, आवाज निचे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविण्याच्या प्रस्तावासह जम्मू काश्मीरची पूनर्रचना करण्याचा प्रस्ताव आज गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकाने ७२ वर्षे जम्मू काश्मीरमध्ये असलेले कलम ३७० हटवण्यात आले. अनेक वर्षापासून सुरु असलेल्या वादावर मोदी आणि शहा यांनी करून दाखवल्याची चर्चा आहे. यावर सोशल मीडियावर आज मिम्सचाही धुमाकूळ सुरु झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर मोदी आणि शहा हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. ‘पूछने नहीं, बताने आया हूं, आवाज निचे’, ‘अपुन को जिंदगी में कुछ डेरिंग करना था’ अशा आशयाचे मिम्स आणि मोदी शहांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

आरोग्यविषयक वृत्त