वायुसेनेला मिळणार नवी ‘पावर’, पाकिस्तानी सेना करू शकणार नाही ‘घुसखोरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकात्मिक एअर कमांड आणि कंट्रोल सिस्टम (आयएससीसीएएस) च्या आगमनानंतर हवाई दलामधील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सामरिक, कार्यवाही आणि युद्धनीतीविषयक निर्णय घेण्यास आता मदत मिळणार आहे. हवाई दलाची सेंट्रल एअर कमांड सात राज्यांमध्ये पसरलेली आहे.

यानंतर जर एखादे ड्रोन, मायक्रो-लाईट्स हेलिकॉप्टर किंवा बलून मध्य कमांडच्या परिसरात दाखल झाले, तर ते त्वरित पकडले जातील. त्यांची छायाचित्रे मुख्यालयात त्वरित पाठवली जातील. तसेच घुसखोरी त्वरित रोखण्यासाठी कारवाई केली जाईल.

नुकत्याच पार पडलेल्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनी, भारतीय हवाई दलाने ‘मेमोरो एअरबेस’ (लखनऊ) मध्ये एकात्मिक एअर कमांड आणि कंट्रोल सिस्टम-आयएसीसीएस पूर्णपणे कार्यरत असल्याचे घोषित केले आहे. ही इंटिग्रेटेड एअर कमांड आणि कंट्रोल सिस्टमची सुधारित आवृत्ती आहे. यामुळे हवाई सीमेच्या संरक्षणाला नवीन ऊर्जा मिळणार आहे. ही यंत्रणा केंद्रीय वायुसेना आणि देशातील सात राज्यांच्या हवाई सीमेवर कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणापासून बचाव करण्यास सक्षम आहे. तात्काळ निर्णय घेण्यासही मिळणार मदत.

या प्रणालीच्या येण्याने, धोरणात्मक कारवाया आणि युद्धाच्या धोरणाशी संबंधित सर्व अधिकारी आणि हवाई दल कर्मचाऱ्यांना निर्णय घेण्यास मदत मिळणार आहे. मध्य वायू कमांड सात राज्यांमध्ये पसरलेली आहे. या प्रणालीमुळे संपूर्ण क्षेत्रात हवाई संरक्षण आणखी वाढेल. ही यंत्रणा एअरफोर्स स्टेशन मेमोरामध्ये स्थापित केली गेली आहे, ज्यामुळे सर्व प्रकारच्या हवाई धोक्यांवर त्वरित कारवाई करण्यास मदत मिळेल.

या नवीन प्रणालीच्या समावेशानंतर, इस्रो आणि जीसॅट -७ ए उपग्रहांच्या मदतीने यापूर्वीच्या तुलनेत भारतीय हवाई दल हल्ल्याचा किंवा अन्य घटनांना अतिशय कमी वेळेत प्रतिसाद देण्यास सक्षम होईल. मिळालेल्या माहितीच्या आधारे, अवाक्स (AWACS) सारख्या सुरक्षा यंत्रणेचा वापर वेळेवर होऊ शकतो आणि दहशतवादी कारवायांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येईल. हे कमांड केंद्र भारताच्या सर्व आंतरराष्ट्रीय सीमांवर नजर ठेवेल आणि अतिशय कमी वेळात भारताच्या तिन्ही सैन्य दलांना माहिती पाठवेल.

आरोग्यविषयक वृत्त –