9 ऑक्टोबरला एकाच टेस्ट मॅचमध्ये डेब्यू केला ‘या’ 2 दोघांनी, एकानं केलं शतक तर दुसर्‍यानं घेतली ‘हॅट्रिक’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद आणि न्यूझीलंडचा पीटर पॅट्रिक यांच्यासाठी 9 ऑक्टोबर हि फार महत्वाची तारीख आहे. याच दिवशी या दोघांनी कसोटी पदार्पण केले होते. त्याचबरोबर आपला पदार्पणाचा सामना दोघांनी देखील यादगार बनवला होता. मियांदाद याने पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली होती, तर पॅट्रिक याने पदार्पणातच हॅट्रिक घेतली होती. 9 ते 13 ऑक्टोबर 1976 रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शानदार 163 धावांची खेळी करत मियांदाद याने 19 चौकार ठोकले होते. त्यानंतर निवृत्तीनंतर मियांदाद खूप काळ पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक देखील होता. या सामन्यात मियांदाद याच्या शतकी खेळीनंतर पॅट्रिक याने शानदार हॅट्रिक देखील नोंदवली होती. या सामन्यात त्याने पहिल्या चेंडूवर मियांदाद याला बाद केले त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर वसीम राजा आणि इंतिखाब आलम याला बाद करत आपली हॅट्रिक पूर्ण केली. या दोन्ही फलंदाजांना तर खाते देखील खोलता आले नव्हते.

मियांदाद याने या सामन्यात पहिल्या डावात 163 धावांची तर दुसऱ्या डावात नाबाद 25 धावांची खेळी केली होती. तर पीटर पॅट्रिक याने पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात दोन फलंदाजांना माघारी धाडले.

Visit : Policenama.com