स्मृतिदिन : वजीर रास्ते यांचे बलिदानाने इंदापूरची मान उंचावली : आ. दत्तात्रय भरणे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सन १९९९ साली भारत पाकीस्तान कारगिल युद्धातील विजयात आपल्या प्राणाची आहूती देवुन बलीदान देणारे मौजे ओझरे ता. इंदापूर येथिल हुतात्मा विर जवान वजीर दत्तात्रय रास्ते यांनी इंदापूर तालुक्याची मान देशपातळीवर अभिमानाने उंचावली असल्याचे मत दत्तात्रय भरणे यांनी ओझरे ता. इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.

ओझरे गावचे वीर सुपुत्र हुतात्मा वीर जवान वजीर दत्तात्रेय रास्ते यांचे बलिदान ओझरे गावाबरोबरच संपूर्ण इंदापूर तालुका कधीही विसरणार नाही.तर वजीर रास्ते यांचे बलिदान तालूक्यातील युवकांना सदैव प्रेरणादायी ठरणार असल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले. ते हुतात्मा वजीर रास्ते यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शहीद हुतात्मा रास्ते यांच्या प्रतिमेस आमदार भरणे यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

शहीद जवान रास्ते यांचे वडील दत्तात्रय रास्ते व लेफ्टनंट जनरल राजेंद्र आर निंभोरकर यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राज्यस्तरीय माजी सैनिक मेळावा, शहीद कुटुंब सन्मान, वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन ओझरे ग्रामस्थ व युवकांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविणभैय्या माने, जेष्ठ नेते हनुमंत कोकाटे,नागेश गायकवाड, सुनिल पालवे, प्रताप पालवे, नाथा रूपनवर उपस्थित होते. यावेळी ओझरे बंधार्‍याची पाहणी ग्रामस्थांसमवेत करून नविन बंधारा बांधकामासाठी जलसंपदा विभागास तब्बल ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून पाठविल्याची माहीती दत्तात्रय भरणे यांनी ग्रामस्थांना दिली.

आरोग्यविषयक वृत्त –